पाकिस्तानला वेगवान गोलंदाजांचा कारखाना म्हटलं जातं. पण सध्या पाकिस्तानात एक फिरकीपटू युवा गोलंदाज जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. अवघ्या १७ वर्षीय पाकिस्तानी फिरकीपटू फैजल अक्रम (Faisal Akram) यानं आपल्या जबरदस्त फिरकीनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची विकेट घेण्याचं त्याचं स्वप्न आहे.
...तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण भारतीय संघात नसते; वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाजांमध्ये नाव घेतलं जाणाऱ्या पाकिस्तानच्या बाबर आझमची विकेट मिळवल्यानंतर फैजल चर्चेत आला होता. दरम्यान, याआधीही फैजलनं पाकिस्तानमधील स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर फैजलनं निवड समितीचंही लक्ष वेधून घेतलं होतं आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी पाकिस्तानच्या संघाच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये गोलंदाजीसाठी त्याला पाचारण करण्यात आलं होतं.
चेन्नईत उतरलं 'स्पेसशिप'!, त्यातून निघालं खतरनाक अस्त्र; RCB चं धमाल ट्विटबाबर आझमची विकेट घेतल्यानंतर चर्चेतफैजलनं पाकिस्तानच्या अंडर-१९ क्रिकेट टीममध्येही आपली वेगळी छाप पाडली आहे. १७ वर्षीय फैजलनं पाकिस्तानकडून राष्ट्रीय अंडर १९ वनडे क्रिकेटमध्ये १० सामन्यांमध्ये २७ विकेट्स घेतल्या आहेत. पण यात त्यानं घेतलेली बाबर आझमची विकेट सर्वांच्या लक्षात राहिली. फैजलनं बाबर आझम याला पायचीत केलं होतं. "बाबर आझम एक वर्ल्ड क्लास खेळाडू आहे. मी थोडा घाबरलो होतो. पण वकार यूनूस माझ्या पाठिशी उभे राहिले. त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला आणि जेव्हा मला बाबर आझमची विकेट मिळाली तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता. मी खूप आनंदी झालो", असं फैजल म्हणाला.
विराटची विकेट घेण्याचं स्वप्नभारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये फैजल अक्रम याला कुणी ओळखत नाही. पण येत्या काळात तो आपली ओळख निर्माण करू शकतो. कारण १७ वर्षीय फैजलनं सांगितलंय की त्याची नजर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या विकेटकडे आहे. विराटची विकेट घेणं आपलं स्वप्न असल्याचं फैजल सांगतो. यासोबतच भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्यानं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक बॅट भेट म्हणून आपल्याला दिली होती, असा खुलासाही फैजलनं केला आहे.