पाकिस्तानने भारत दौ-यावर येण्यास नकार दिल्यानंतर भारताकडून आशिया कप 2018 चं यजमानपद हिसकावलं गेलं आहे. आता ही स्पर्धा यूएईमध्ये खेळली जाणार आहे. आशिया कप 13 ते 28 सप्टेंबर दरम्यान खेळला जाणार आहे.
आशिया कपमध्ये एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश या संघांची जागा निश्चित आहे. प्लेऑफमध्ये यूएई, हॉंगकॉंग, नेपाळ, मलेशिया आणि ओमान हे संघ खेळतील. यातील जो संघ विजयी होईल त्याला आशिया कपमध्ये खेळण्याची संधी मिळेल.
आशिया कपचं हे 14वं सीझन असेल. याआधी 12 वेळा आशिया कप वनडे फॉर्मॅटमध्ये खेळवण्यात आला होता. गेल्यावेळी हे सामने टी20 फॉर्मॅटमध्ये खेळवण्यात आले.