कोलंबो : श्रीलंकेच्या सर्व २४ क्रिकेटपटूंनी नवीन केंद्रीय कराराची ऑफर नाकारली. श्रीलंका क्रिकेटकडून (एसएलसी) देण्यात आलेल्या करारावर त्यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. करारातील वर्गवारीत पारदर्शकतेचा अभाव असल्याचे या क्रिकेटपटूंचे मत आहे.
क्रिकेटपटूंच्यावतीने वकील निशान प्रेमाथिरत्ने म्हणाले, ‘अन्यायकारक आणि पारदर्शक नसलेल्या करारावर खेळाडूंनी असहमती दर्शवली आहे. क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, नव्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी खेळाडूंना ३ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
प्रत्येक विभागात आपण किती काम केले आहे याची आम्हाला कल्पना नाही. त्यामुळे एसएलसीने हा अहवाल आमच्यासमोर सादर केला पाहिजे, असे खेळाडूंचे म्हणणे आहे. श्रीलंकेचा संघ सध्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर आहे.
अशी होते खेळाडूंची वर्गवारी
एसएलसीने लागू केलेल्या नव्या यंत्रणेत पारदर्शकता हवी अशी मागणी केली जात आहे. २०१९ पासून केलेल्या कामगिरीवर ५० टक्के, खेळाडूंच्या फिटनेसवर २० टक्के आणि नेतृत्व, व्यावसायिकता आणि भविष्यातील संभाव्यता आणि अनुकूलता यासाठी प्रत्येकी १० टक्के अशा स्वरुपात खेळाडूंना मानधन देण्याचे काम ही यंत्रणा करते.
Web Title: 24 Sri Lankan cricketers reject central agreement, lack transparency, refuse to sign
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.