IPL 2024 GT Vs SRH : आयपीएलमध्ये फक्त दोन हंगाम खेळूनही गुजरात टायटन्सने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. यंदाच्या आयपीएल २०२४ च्या हंगामात गुजरात टायटन्सच्या संघाने दमदार कामगिरी करत आपली चमक दाखवली आहे. पण, या सामन्यात क्रिकेटपटूंच्या खेळीपेक्षा एका लहानग्या चिमुकल्याने केलेल्या कृतीने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं. गुजरात विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा गुजरात संघाला चीअर अप करताना दिसतोय. आपल्या आवडत्या संघाला चीअर करताना तो भर स्टेडीयममध्ये खूर्चीवर चढून उड्या मारताना दिसतोय. शिवाय आपलं टी-शर्ट काढून तो मुलगा नाचत आहे. हा व्हायरल व्हिडिओ क्रिकेट प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या मुलाला पाहून अनेकांना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आठवला. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील विजयानंतर लॉर्ड्सच्या बालकनीत त्याने असेच सेलिब्रेशन केले होते. दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सने नेतृत्वाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवली आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे गेल्याने गुजरात टायटन्सला हा निर्णय घ्यावा लागला. या हंगामात ३ सामन्यांपैकी दोन सामने जिंकण्यात गुजरातचा संघ यशस्वी ठरला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांचा झंझावात रोखण्यात गुजरात टायटन्सला यश आलं. गुजरातच्या संघाने टिच्चून मारा करताना हैदराबादच्या धावगतीला वेसण घातले. हैदराबदवर विजय मिळवत गुजरातने आपल्या गुणतालिकेत आगेकुच केली.
दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आमि चेन्नई सूपर किंग या दोन्ही संघांचे कर्णधार या हंगामात बदलले आहेत. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे गेल्याने गुजरात टायटन्सचं नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे. या हंगामात ३ सामन्यांपैकी केवळ दोन सामने जिंकण्यात गुजरातचा संघ यशस्वी ठरला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांचा झंझावात रोखण्यात गुजरात टायटन्सला यश आलं. गुजरातच्या संघाने टिच्चून मारा करताना हैदराबादच्या धावगतीला वेसण घातले. हैदराबदवर विजय मिळवत गुजरातने आपल्या गुणतालिकेत आगेकुच केली.