ठळक मुद्देया सामन्यात बाद करण्याचा कोणताही नियम नसेल, पण कोण किती षटकार मारतो, हे आपण पाहू, असे आव्हान आफ्रिदीने गेलला दिले आहे.
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी हे दोघेही धडाकेबाज फलंदाज. आफ्रिदीने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण गेल अजूनही खेळतोय. गेलने आफ्रिदीच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्यामुळेच आफ्रिदीने गेलला ' हे ' आव्हान दिले आहे.
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यामध्ये सध्याच्या घडीला एकदिवसीय क्रिकेटची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात गेलने 66 चेंडूंत 73 धावांची खेळी साकारली. या खेळीमध्ये गेलने पाच षटकार लगावले. त्यामुळे गेलने आफ्रिदीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 476 षटकारांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्यामुळेच आफ्रिदीने गेलला ' सिंगल विकेट ' सामना खेळण्यासाठीचे आव्हान दिले आहे. या सामन्यात बाद करण्याचा कोणताही नियम नसेल, पण कोण किती षटकार मारतो, हे आपण पाहू, असे आव्हान आफ्रिदीने गेलला दिले आहे.
आफ्रिदीने ट्विटरवर काय म्हटले आहे ते वाचा
Web Title: Afridi has given challenge to Gayle
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.