Join us  

आफ्रिदीने गेलला दिले ' हे ' आव्हान

गेलने आफ्रिदीच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्यामुळेच आफ्रिदीने गेलला ' हे '  आव्हान दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 6:09 PM

Open in App
ठळक मुद्देया सामन्यात बाद करण्याचा कोणताही नियम नसेल, पण कोण किती षटकार मारतो, हे आपण पाहू, असे आव्हान आफ्रिदीने गेलला दिले आहे.

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी हे दोघेही धडाकेबाज फलंदाज. आफ्रिदीने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण गेल अजूनही खेळतोय. गेलने आफ्रिदीच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्यामुळेच आफ्रिदीने गेलला ' हे '  आव्हान दिले आहे.

वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यामध्ये सध्याच्या घडीला एकदिवसीय क्रिकेटची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात गेलने 66 चेंडूंत 73 धावांची खेळी साकारली. या खेळीमध्ये गेलने पाच षटकार लगावले. त्यामुळे गेलने आफ्रिदीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 476 षटकारांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्यामुळेच आफ्रिदीने गेलला ' सिंगल विकेट ' सामना खेळण्यासाठीचे आव्हान दिले आहे. या सामन्यात बाद करण्याचा कोणताही नियम नसेल, पण कोण किती षटकार मारतो, हे आपण पाहू, असे आव्हान आफ्रिदीने गेलला दिले आहे.

आफ्रिदीने ट्विटरवर काय म्हटले आहे ते वाचा

टॅग्स :शाहिद अफ्रिदीक्रिकेट