Team India: संजू सॅमसनच्या निवडीचे प्रकरण पोहचले 'राजकारणात', शशी थरूर यांनी व्यक्त केली नाराजी 

संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळत नसल्याने शशी थरूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 02:40 PM2022-11-30T14:40:18+5:302022-11-30T15:01:47+5:30

whatsapp join usJoin us
After Rishabh Pant's failure yet again, Shashi Tharoor says Sanju Samson has been denied another chance  | Team India: संजू सॅमसनच्या निवडीचे प्रकरण पोहचले 'राजकारणात', शशी थरूर यांनी व्यक्त केली नाराजी 

Team India: संजू सॅमसनच्या निवडीचे प्रकरण पोहचले 'राजकारणात', शशी थरूर यांनी व्यक्त केली नाराजी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघातील यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला भारतीय संघात संधी न मिळाल्याचा मुद्दा सातत्याने जोर धरत आहे. संजू सॅमसनचा भारतासाठी वनडे सामन्यांमध्ये शानदार विक्रम असूनही त्याला भारतीय संघात नियमित संधी मिळत नाही. यावरून सॅमसनचे चाहते विविध स्तरातून नाराजी व्यक्त करत आहेत. सॅमसनच्या समर्थनार्थ काही चाहत्यांनी फिफा विश्वचषकात बॅनर झळकावले होते. आता काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही सॅमसनला संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

खरं तर संजू सॅमसन नियमितरित्या भारतीय संघाचा हिस्सा नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात ३६ धावा केल्यानंतर, सॅमसनला दुसऱ्या वनडे सामन्यातून वगळण्यात आले होते, कारण संघ व्यवस्थापनाला गोलंदाजीही करू शकणारा अष्टपैलू फलंदाज हवा होता. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाने तिसऱ्या वनडे सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हन बदलली नाही आणि संजू सॅमसन या सामन्यातही खेळू शकला नाही.

संजू सॅमसनचे केले कौतुक 
तिसर्‍या वनडे सामन्यापूर्वी भारताचे स्टँड-इन प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण हे ऋषभ पंतने वनडेमध्ये कुठे फलंदाजी करावी याबद्दल बोलत होते. यावरूनच काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी लक्ष्मण यांच्या बोलण्यावरून नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "पंतने चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याला पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणतात तो चांगला खेळाडू आहे पण पंत त्याच्या शेवटच्या ११ डावांपैकी दहा डावात तो अपयशी ठरला आहे म्हणजेच तो फॉर्ममध्ये नाही. वनडे सामन्यांमध्ये सॅमसनची सरासरी ६६ आहे, त्याने मागील पाच सामन्यांमध्ये धावा केल्या आहेत आणि तो बाकावर बसलेला आहे."

सॅमसनने आत्तापर्यंत ११ वनडे सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ६६च्या सरासरीने ३३० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये नाबाद ८६ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. विशेष बाब म्हणजे न्यूझीलंडविरूद्धच्या अखरेच्या वनडे सामन्यात देखील रिषभ पंत काही खास कामगिरी करू शकला नाही. पंत पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतले. पंत १६ चेंडूत १० धावा करून तंबूत परतला, त्याला डेरी मिचेलने बाहेरचा रस्ता दाखवला. 

पंतला विश्रांतीची गरज - शशी थरूर 
रिषभ पंत पुन्हा एकदा फेल झाल्यानंतर शशी थरूर यांनी आणखी एक ट्विट केले. "पंतचे आणखी एक अपयश, ज्याला स्पष्टपणे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांतीची गरज आहे. संजू सॅमसनची आणखी एक संधी नाकारली, ज्याला आता वाट पाहावी लागेल. @IPL तो भारतातील सर्वोत्तम टू ऑर्डर बॅट्सपैकी एक आहे हे दाखवण्यासाठी."

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: After Rishabh Pant's failure yet again, Shashi Tharoor says Sanju Samson has been denied another chance 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.