नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचे जेतेपद पटकावले. या जेतेपदानंतर धोनी अशा एका ठिकाणी गेला की, ज्या ठिकाणी प्रत्येक वेळा यश मिळाल्यावर तो जातो, ते ठिकाण नेमकं कोणतं...
धोनीने 2007 साली भारताला ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकवून दिला. त्यानंतर धोनी यशोशिखरावर पोहोचला होता. 2011 चा विश्वचषकही धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने जिंकला. पण कालांतराने धोनीला भारताचे कर्णधारपद सोडावे लागले. त्यानंतर धोनी जास्त काळ क्रिकेट खेळू शकणार नाही, अशा चर्चांना उत आला होता. पण धोनीने यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार फलंदाजी केलीच, पण आपल्या चाहत्यांना जेतेपदाची भेटही दिली. पण हे जेतेपद जिंकल्यावर धोनी त्या ठिकाणी गेला, जेव्हा तो यशस्वी ठरल्यावर यापूर्वीही जात होता.
धोनीने जेतेपद पटकावले. त्यानंतर तो घरी आला आणि थेट निघाला तो झारखंड येथील देवडी येथील एका दुर्गा मंदिरात. जेव्हा जेव्हा धोनीला यश मिळाले तेव्हा तो या मंदिरात येऊन दर्शन घेतो, असे म्हटले जाते. शालेय जीवनापासून धोनी या मंदीरात येतो. आता आयुष्यात महत्वाच्या गोष्टी घडल्यावर धोनी या मंदीरात आल्यावाचून राहत नाही.