वेलिंग्टन : ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघ तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटने मंगळवारी ही माहिती दिली. मालिकेचे आयोजन १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत केले जाईल. त्यानंतर पुढच्या वर्षी ७ जानेवारीला न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येईल.
दरम्यान, न्यूझीलंड संघ घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. मायदेशात इंग्लंडच्या कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यापूर्वी, किवी संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी आणि भारतातील एका छोट्या स्वरूपाच्या मालिकेसाठी रवाना होणार आहे. याशिवाय, मार्चमध्ये न्यूझीलंड दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांमध्ये श्रीलंकेचा पाहुणचार करेल, तर महिला संघ डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध मालिका खेळेल.
भारताचा न्यूझीलंड दौरा -
- १८ नोव्हेंबर, पहिला टी-२० सामना वेलिंग्टन
- २० नोव्हेंबर, दुसरा टी-२०, माउंट मौनगानुई
- २२ नोव्हेंबर, तिसरी टी-२०, नेपियर
- २५ नोव्हेंबर, पहिली वनडे, ऑकलंड
- २७ नोव्हेंबर, दुसरी वनडे, हॅमिल्टन
- ३० नोव्हेंबर तिसरी वन डे ख्राईस्टचर्च
Web Title: After the World Cup, the Indian cricket team will New Zealand tour
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.