Join us  

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेची IPL 2022 च्या उर्वरित स्पर्धेतून माघार; इंग्लंड दौऱ्यालाही मुकण्याची शक्यता, हे आहे कारण

अजिंक्य रहाणे IPL मध्येही ठरला फ्लॉप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 6:45 PM

Open in App

Ajinkya Rahane, IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्सचा संघ IPL 2022 मध्ये प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी झगडत आहे. याच दरम्यान त्यांना एक मोठा धक्का बसला असून त्यांचा अनुभवी सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणे दुखापतग्रस्त झाला आहे. अजिंक्य रहाणेला हॅमस्ट्रिंगची (स्नायूंची) दुखापत झाली असल्याने त्याने उर्वरित IPL मधून माघार घेतली. याचाच अर्थ आता KKRच्या उर्वरित लीग सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाही. KKR ने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १३ सामन्यांपैकी ६ विजय मिळवले आहेत. तर ७ सामने गमावले आहेत. त्यामुळे १२ गुणांसह त्यांचा संघ सहाव्या स्थानावर आहे.

IPL 2022 संपल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंडला जाईल. तिथे टीम इंडिया एक कसोटी आणि त्यासोबतच वन डे आणि टी२० मालिका खेळणार आहे. परंतु, नुकत्याच झालेल्या दुखापतीमुळे अजिंक्य रहाणे इंग्लंड दौऱ्यासाठी उपलब्ध होणार नसल्याचे मानले जात आहे. IPL पूर्वी श्रीलंकेविरुद्ध मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेसाठी रहाणेची भारतीय संघात निवड झाली नव्हती. तशातच आता या दुखपातीमुळे त्याला आगामी कसोटी मालिका संधी मिळणार की नाही, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२अजिंक्य रहाणेकोलकाता नाईट रायडर्सभारतीय क्रिकेट संघ
Open in App