मॅंचेस्टर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. टी-२० सामन्यात सर्वांत जलद २००० धावा करणाऱ्या खेळाडूमध्ये स्थान पटकाविण्यात तो यशस्वी झाला. त्याला हा विक्रम करण्यासाठी अवघ्या ८ धावांची गरज होती आणि त्याने इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या टी-२० सामन्यात मंगळवारी नाबाद २० धावा करून हा विक्रम नोंदवला. त्यामुळे टी-२० सामन्यात सर्वांत जलद दोन हजार धावांचा टप्पा ओलंडण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.
शिखर धवन आणि रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. या सामन्यातील १६ व्या षटकात त्याने २००० धावांचा पल्ला पार केला. अवघ्या ५६ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याने हा पराक्रम केला आहे. या लढतीत भारताने आठ विकेट्स राखून इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. लोकेश राहुलची नाबाद शतकी खेळी आणि कुलदीप यादवच्या पाच विकेट्सच्या जोरावर भारताने विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
ट्वेंटी-२० त दोन हजार धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तिल (२२७१) आणि ब्रॅंडन मॅककुलम (२१४०) हे आघाडीवर आहेत, तर २०३९ धावांसह पाकिस्तानचा शोएब मालिक तिसऱ्या स्थानी आहे. या क्रमवारीत आगेकूच करण्यासाठी कोहलीला २८ धावा हव्या आहेत.
रोहित शर्मालाही दोन हजार धावा पूर्ण करण्याची संधी होती. त्याला त्यासाठी 51 धावांची गरज होती, परंतु तो ३२ धावा करून माघारी परतला. दुसऱ्या सामन्यात तो हा विक्रम नोंदवू शकतो.
Web Title: Another record for Virat's head! Know what is ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.