टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना मागील महिन्यात कन्यारत्न झाले. विराट-अनुष्काच्या लेकीचं नाव काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती आणि सोमवारी अनुष्कानं लेकीसोबतचा फोटो पोस्ट करून तिचं नाव जाहीर केलं. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला होता. भारताचे क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन आणि रोहित शर्मा या सर्वांना मुलगी आहे आणि त्यांच्या क्लबमध्ये विराटचा समावेश झाला आहे. विराट कोहलीनं बदललं ट्विटर बायो; भारतीय क्रिकेटपटू, हेच गायब!
विराट आणि अनुष्का यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. त्यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता. या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि 2017 साली दोघांनी इटलीत लग्न केले. 'या डिलिव्हरीने तर Bold केलं'; अमूलने खास अंदाजात केलं विराट-अनुष्काच्या चिमुकलीचे स्वागत
अनुष्कानं सोमवारी तिघांचा फोटो पोस्ट केला आणि तिनं लेकीचं नाव वामिका ( Vamika) असं ठेवल्याचं जाहीर केलं. लेकीचा सोशल मीडियावरील पहिलाच फोटो शानदार बनवण्यासाठी अनुष्कानं विषेश कॅप्शनही लिहिली. तिनं लिहिले की,''आम्ही एकत्र प्रेम व कृतज्ञतेसह राहत होतो, परंतु या छोट्याशा वामिकानं आमच्या आनंदात आणखी भर टाकली. रडणं, हसणं, चिंता, आनंद या सर्व भावना आम्ही एका क्षणात अनुभवल्या. तुम्ही दाखवलेलं प्रेम व प्रार्थना यासाठी आभारी आहे.'' जवळच्या नातेवाईकांना देखील अनुष्का-बाळाला भेटण्यासाठी नो एंट्री, या कारणामुळे घ्यावा लागला विराटला हा निर्णय