दुबई, आशिया चषक 2018 : आशियाच चषक स्पर्धेत भारतचा पहिला सामना मंगळवारी रंगणार आहे. या स्पर्धेसाठी संघ निवड करताना काही खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा यावेळी अंबाती रायुडू आणि केदार जाधव यांच्या पुनरागमनाने आनंदी असल्याचे समजत आहे.
भारतीय संघाने पहिल्या सामन्यासाठी सराव करायला सुरुवात केली आहे. पण सरावाला मार्गदर्शन करण्यासाठी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री गैरहजर आहेत. त्यामुळे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यावेळी भारताच्या खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे.
संघातील खेळाडूंच्या पुनरागमनाबद्दल रोहित म्हणाला की, " रायुडू आणि केदार हे दोघेही गुणवान खेळाडू आहेत. या स्पर्धेसाठी त्यांचे संघात पुनरागमन होत आहे. ही गोष्ट संघासाठी लाभदायक आहे. कारण या दोन्ही खेळाडूंच्या पुनरागमनामुळे संघाचे मनोबल उंचावण्यास मदत होईल. त्याचबरोबर त्यांच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतील. "