लंडन : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये आजपासून ऐतिहासिक अॅशेस मालिकेला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कप विजयानंतर ही पहिलीच महत्त्वाची मालिका असल्यानं इंग्लंडच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बर्मिंगहॅम येथे अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. आतापर्यंत उभय संघांमध्ये 70 अॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या. त्यामुळे यंदा घरच्या मैदानावर विजय मिळवून पुन्हा अॅशेस आपल्याकडे आणण्याचा इंग्लंडचा निर्धार आहे.
पण, पुरुषांच्या अॅशेस मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच यजमानांना धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियानं महिलांच्या अॅशेस मालिकेत 12-4 असा विजय मिळवला आहे. इंग्लंडच्या महिला संघाला सलग तिसऱ्यांदा अॅशेस मालिका गमवावी लागली.