पुणे : दिग्गजांच्या लढाईत उद्या रविवारी आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज आणि अव्वल स्थानावरील सनरायझर्स हैदराबाद एकमेकांपुढे येणार आहेत.चेन्नईला ‘प्ले आॅफ’साठी उर्वरित तीन सामन्यांपैकी एक विजय हवा आहे. हैदराबाद संघ आधीच प्ले आॅफमध्ये दाखल झाला. दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये परतलेल्या चेन्नईचे ११ सामन्यांत १४ गुण आहेत. राजस्थान रॉयल्सकडून काल पराभूत झाल्याने या संघाची प्ले आॅफची प्रतीक्षा वाढली. १७६ धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका धोनीने गोलंदाजांवर ठेवला. चेंडू कसे टाकायचे, हे ठाऊक असताना गोलंदाजांनी आम्हाला निराश केल्याचे धोनीने पत्रकारांशी बोलताना सांगितले. चेन्नईचे फलंदाज धावा काढण्यात तरबेज मानले जातात. शेन वॉटसन, अंबाती रायुडू, सुरेश रैना, धोनी, ड्वेन ब्राव्हो हे चांगल्या धावा काढतात, पण गोलंदाजांकडून त्यांना साथ मिळत नाही.दुसरीकडे ११ सामन्यांत १८ गुण असलेल्या सनरायझर्सचे नेतृत्व केन विल्यम्सनने यशस्वीरीत्या सांभाळले. सलामीच्या शिखर धवनने २९०, विल्यम्सनने ४९३ धावा काढल्या. युसूफ पठाण, मनीष पांडे, शाकिब अल हसन हेदेखील धावा काढण्यात योगदान देत आहेत. सनरायझर्सची ताकद त्यांची गोलंदाजीआहे. भुवनेश्वर कुमारच्या मार्गदर्शनात सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा,लेगस्पिनर राशिद खान आणि शाकिब यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांनाघाम फोडला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- सुपरकिंग्ज-सनरायझर्स यांच्यात वर्चस्वासाठी लढाई
सुपरकिंग्ज-सनरायझर्स यांच्यात वर्चस्वासाठी लढाई
दिग्गजांच्या लढाईत उद्या रविवारी आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज आणि अव्वल स्थानावरील सनरायझर्स हैदराबाद एकमेकांपुढे येणार आहेत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 4:26 AM