इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13व्या मोसमाच्या टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क Dream 11ला मिळाल्याची अधिकृत घोषणा आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलनं बुधवारी केली. ड्रीम 11ही भारतीय कंपनी आहे आणि तीचे मूळ महाराष्ट्रातील मुंबई येथे आहे. मागील अनेक वर्षांत ड्रीम 11नं आपला पसारा वाढवला आहे आणि सध्या ही कंपनी 19 स्पोर्ट्स लीगच्या स्पॉन्सरर्समध्ये आहे. त्यापैकी भारतातील 6 लीगचा समावेश आहे.
आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले की,''आयपीएल 2020च्या टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क ड्रीम 11ने मिळवले आहेत आणि आम्ही त्यांचे स्वागत करतो. आयपीएलसोबत जोडल्यानं ड्रीम 11च्या चाहतावर्गही वाढणार आहे. डिजीटल ब्रँड असल्यानं त्यांना त्यांच्या ग्राहकांना आता आणखी महत्त्वाचा कंटेन्ट देता येणार आहे.''
ड्रीम 11चे सीईओ आणि सह संस्थापक हर्ष जैन यांनी सांगितले की,''2008मध्ये आयपीएलच्या जन्मानंतर आम्हाला ड्रीम 11ची कल्पना सूचली. आम्हाला टायटल स्पॉन्सरशिप दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार.''
स्पॉन्सरशिपसाठी ड्रीम 11नं 222 कोटींची बोली लावली, तर अनअकॅडमीनं 210, टाटा सन्सनं 180 आणि बायजूनं 125 कोटींची बोली लावली होती. त्यामुळे ड्रीम 11ने बाजी मारली. ड्रीम 11 ही चायनीस कंपनी आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. ड्रीम 11वा टर्न ओव्हर 736 कोटींचा आहे. मुंबईतील हर्ष जैन व भावीत सेठ यांनी 2012मध्ये ही कंपनी सुरू केली. 2019मध्ये ही कंपनी भारतातील पहिली गेमींग कंपनी बनली.
पण, ड्रीम 11चं चायनीज कनेक्शन आहे. त्यांच्या कंपनीत Steadview, Kalaari Capital, Think Investments, Multiples Equity आणि Tencent आदी कंपनींचीही गुंतवणूक आहे. Tencent ही चायनीज कंपनी आहे. जगातील सर्वात मोठी गेमिंग कंपनी म्हणून Tencentची ओळख आहे आणि त्यांची ड्रीम 11मध्ये 10 टक्के भागीदारी आहे. त्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
रांचीमधील मंदिर अन् धोनी...असं आहे श्रद्धेचं नातं; जाणून घ्या सर्वकाही
महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा?
CPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा 'हॅलिकॉप्टर' शॉट मिस करताय; मग रशीद खानचा 'हा' फटका पाहाच
"Dream 11सोबत सौदा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला मोठा धक्का!"
महेंद्रसिंग धोनी 1,250 फुटांवरून झेप घेतो तेव्हा... पाहा थरारक व्हिडीओ
IPL 2020 : होय, Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक, पण...; BCCIनं मांडली बाजू