कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) वर अनिश्चिततेचं सावट अजूनही कायम आहे. आयपीएलच्या मार्गातील आशिया चषक स्पर्धेचा अडथळा दूर झाला आहे आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही स्थगित होण्याची दाट शक्यता आहे. पण, तरीही आयपीएल नक्की खेळवायची कुठे हा प्रश्न बीसीसीआयला सतावत आहे. भारतातील सध्याच परिस्थिती पाहता येथे आयपीएल खेळवणे अशक्यच आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर ( बीसीसीआय) श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती ( यूएई) हे दोन पर्याय आहेत. आयपीएलसाठी आता बीसीसीआयनं जोरदार हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बदल करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचा नुकसान होण्याचा अंदाज अध्यक्ष सौरव गांगुलीनं व्यक्त केला होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्यास त्या काळात आयपीएल खेळवता येईल. तसे झाल्यास ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बदल केला जाऊ शकतो.
ट्वेंटी-20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-20 मालिकेसाठी दाखल होणार होती आणि त्यानंतर वर्ल्ड कप अन् कसोटी व वन डे मालिका असे वेळापत्रक होते. पण, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच होणार नसेल, तर आधी जाण्यात काहीच अर्थ नसल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बदल होण्याची शक्यता आहे.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआय अधिकाऱ्यानं सांगितले की,''केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या परवानगी शिवाय आम्ही काहीच करू शकत नाही.''
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
११ आॅक्टोबर : पहिला टी-२० सामना, ब्रिस्बेन१४ आॅक्टोबर : दुसरा टी-२० सामना, कॅनबेरा१७ आॅक्टोबर : तिसरा टी-२० सामना, अॅडिलेड३ डिसेंबरपासून : पहिली कसोटी, ब्रिस्बेन११ डिसेंबरपासून : दुसरी कसोटी, अॅडिलेड (डे नाईट)२६ डिसेंबरपासून : तिसरी कसोटी, मेलबोर्न३ जानेवारीपासून : चौथी कसोटी, सिडनी१२ जानेवारी : पहिला एकदिवसीय सामना, पर्थ१५ जानेवारी : दुसरा एकदिवसीय सामना, मेलबोर्न१७ जानेवारी : तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
अन्य महत्त्वाच्या बातम्या
दिग्गज खेळाडूच्या मुलाचा 'हॉट' अभिनेत्रीसोबत साखरपुडा; फोटो व्हायरल
... म्हणून शिखर धवनची पत्नी किक बॉक्सिंग शिकली; सत्य जाणून बसेल धक्का!
महेंद्रसिंग धोनीनंतर विराट कोहलीचा लॉकडाऊन लूक व्हायरल; डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!
ENG v PAK : पाकिस्तानी क्रिकेटपटूंची राहण्यासाठी सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर...
भारत-पाकिस्तान मालिका विचारातच घेत नाही, कारण...; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं वादग्रस्त विधान