भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यानंतर नाराजीचा सूर आवळला होता. भविष्यात वेळापत्रक तयार करताना काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. एकाच वेळी सर्व खेळाडूंकडून मानसिक कणखरतेची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला त्यात थोडे बदल करावे लागतात, असे स्पष्ट मत विराटनं व्यक्त केलं होतं. यावर BCCIनं उत्तर देताना सांगितले की, कोणत्याही खेळाडूला सर्व सामने खेळण्याची सक्ती केलेली नाही. IPL 2021 : चेतेश्वर पुजारामुळे जोश हेझलवूडनं घेतली माघार?; जाणून घ्या काय खरं, काय खोटं!
IANS शी बोलताना BCCIच्या अधिकाऱ्यानं सांगितले की,''खेळाडूंनी सर्व सामने खेळावे, अशी सक्ती बीसीसीआयनं कधीच केली नाही. कोरोना व्हायरसचं संकट लक्षात घेऊन वेळापत्रकाची आखणी केली गेली आहे. पुढे काय होईल, याची हमी कोणीच देऊ शकत नाही. संघाचे बेंच स्ट्रेंथ पाहता, जर एखाद्या खेळाडूला ब्रेक घ्यायचा असेल किंवा आराम करायचा असेल तर तो घेऊ शकतात. बीसीसीआयनं तो निर्णय खेळाडूंवर सोडला आहे. '' IPL 2021 : टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजाला लॉटरी, माजी विजेत्यांनी केलं करारबद्ध
भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंच्या जोरावर ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली मायदेशात परतला, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार हे अनुभवी गोलंदाजही नव्हते. तरीही मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर यांच्या जोरावर टीम इंडियानं इतिहास रचला. रोहित शर्माही पहिल्या दोन कसोटींना मुकला होता. IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सची 'सुपर हिट' जोडी पुन्हा एकत्र दिसली, सुरेश रैनाची भावनिक पोस्ट, Video
कोहलीनं या बेंच स्ट्रेंथचं कौतुक केले. तो म्हणाला, आमच्याकडे दोन-तीन खेळाडूंचा पर्याय उपलब्ध आहे. भारतीय क्रिकेटसाठी हा चांगला संकेत आहे. संघाची वाटचाल योग्य दिशेनं सुरू आहे आणि खेळाडूंची निवड करताना आमच्याकडे बरेच खेळाडू आहेत.