कोरोना व्हायरसमुळे जगावर आलेलं संकट कधी पूर्णपणे दूर जाईल, याची खात्री देणे अवघडच आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत आणि त्यामुळे संघटनांना व खेळाडूंना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यामुळे स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवण्याचा विचार सुरू आहे. इंडियन प्रीमिअर लीगचा 13 वा मोसमही बंद स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. कोरोनामुळे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर अनिश्चिततेचं सावट असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआय टीम इंडियाच्या खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाईन करण्यासही तयार आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यानंतर खेळाडूंना दोन आठवडे क्वारंटाईन जाण्यास काहीच हरकत नाही, असं मत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं व्यक्त केलं. भारतीय संघ डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार कसोटी व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. हा दौरा न झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 300 मिलियन डॉलरचे नुकसान होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही मालिका खेळवण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी चर्चाही सुरू आहे. ऑस्ट्रेलियाचे क्रीडा मंत्री रिचर्ड कोल्बेक यांनी या मालिकेसाठी सकारात्मकता दर्शवली होती.
प्रेक्षकांशिवाय क्रिकेट खेळणे म्हणजे...; Virat Kohli नं मांडलं स्पष्ट मत
''ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यानंतर दोन आठवडे क्वारंटाईन जाण्याशिवाय पर्याय नाही. सर्वच जणं हा नियम पाळत आहेत. क्रिकेट पुन्हा सुरू व्हायला हवं,''अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे खजिनदार अरुण सिंग धुमाळ यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डला दिली. ते पुढे म्हणाले,''दोन आठवडे हा मोठा काळ नाही. कोणत्याही खेळाडूसाठी क्वारंटाईन होण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. परदेशात गेल्यानंतर दोन आठवडे लॉकडाऊन होणे, चांगली गोष्ट आहे. लॉकडाऊननंतर काय नियम असतील तेही आम्ही पाहू.''
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियानं पाच कसोटी सामने खेळावेत, असा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. महसूल मिळवण्यासाठी अधिक मर्यादित षटकांचे सामने खेळवले जाऊ शकतात, असे संकेत धुमाळ यांनी दिले. ते म्हणाले,''लॉकडाऊन पूर्वीच पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेवर चर्चा झाली होती. जर तशी विंडो उपलब्ध असेल, तर बोर्ड निर्णय घेईल की कसोटी सामने खेळायचे की दोन वन डे किंवा ट्वेंटी- 20 सामने खेळवायचे. कसोटीपेक्षा वन डे आणि ट्वेंटी-20 सामन्यांतून अधिक महसूल मिळवला जाऊ शकतो. लॉकडाऊनमुळे सर्वच बोर्डांचा महसूल बुडाला आहे आणि त्यामुळे तो कसा मिळवता येईल, याचा विचार झाला पाहिजे.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक: दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू Corona Positive; यकृत अन् मूत्रपिंड झाले निकामी
शाहिद आफ्रिदीच्या All Time वर्ल्ड कप संघात Sachin Tendulkarला स्थान नाही
इंग्लंडच्या विश्वविक्रमी फलंदाजाचे निधन; आजही 'तो' विक्रम अबाधित
औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवर कुस्तीपटू बबिता फोगाटचं ट्विट, म्हणाली...
Corona Virus : पाकिस्तानी फलंदाजाच्या तिहेरी शतकाची बॅट पुण्याच्या संग्रहालयात; मोजले लाखो रुपये