कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धाही रद्द करण्यात आलेल्या आहेत किंवा बंद स्टेडियममध्ये खेळवल्या जात आहेत. इंडियन प्रीमिअर लीगही ( आयपीएल 2020) २९ मार्चला सुरू होणार होती, परंतु सद्यस्थिती पाहता ती १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) शुक्रवारी घेतला. देशात कोरोना संक्रमित लोकांची संख्या १०२ पर्यंत गेली आहे. देशातील कोरोना विषाणूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खेळाडूंसह प्रेक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं बीसीसीआय लवकरच योग्य तो निर्णय घेण्याची शक्यता आहे.
कोरोनाग्रस्तांसाठी रोनाल्डोचा पुढाकार; हॉटेल्सची केली रुग्णालयं अन् देतोय मोफत उपचार!
शनिवारी आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आठ फ्रँचायझी मालकांसह तातडीची बैठक पार पडली आणि त्यात अनेक विषयांवर चर्चा केली गेली. प्रत्येकानं आपापली मतं व्यक्त करताना प्रेक्षकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. या बैठकीत ६-७ पर्यायांवर चर्चा केली गेली. आयपीएल स्पर्धा उशीरानं सुरु झाली, तर लीगचे स्वरूप कसे असेल, आठ संघांची दोन गटांत विभागणी करून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेप्रमाणे लीग खेळवता येईल का, डबल हेडर सामन्यांची संख्या वाढवली जाऊ शकते का की दिवसाला तीन सामने खेळवण्यात यावे, आदी अनेक मुद्यांवर चर्चा केली गेली.
याचवेळी परिस्थिती सुधारल्यास आयपीएल कोणत्या तारखेपासून सुरू करायची यावरही चर्चा झाली. त्यानुसार १५ एप्रिल, २१ एप्रिल, २५ एप्रिल, १ मे आणि ५ मे अशा तारखांचा पर्याय ठेवण्यात आळा. त्यामुळे परिस्थिती सुधारल्यास या पाचपैकी एका तारखेपासून आयपीएल सुरू होईल. बीसीसीआयनं हे आधीच स्पष्ट केलं आहे की ही स्पर्धा २५ एप्रिलपर्यंत सुरू केली जाईल. तसे न झाल्यास पुढे सर्व सामने खेळवण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यानं इंडिनय एक्स्प्रेसला सांगितले की,''२००९मध्ये जेव्हा आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती, तेव्हा ती ३७ दिवसांत आटोपली होती. त्यामुळे आयपीएलचे १३वे मोसम २५ एप्रिलला सुरु झाल्यात ते मे अखेरपर्यंत संपू शकते. पण, २५ एप्रिलच्या पुढे गेल्यास लीग आयोजन करणे अवघड होऊन बसेल. तेव्हा होम-अवे संकल्पना गुंडाळण्याचा पर्याय समोर राहिल आणि प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध एकच सामना खेळू शकेल किंवा संघांची दोन गटांत विभागणी केली जाईल. पण, यात तुल्यबळ संघांमधली चुरस पाहायला मिळणे अवघड होईल.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Corona Virus मुळे आता 'मिनी आयपीएल'चा प्रस्ताव; वर्ल्ड कपचा फॉरमॅट कॉपी करणार?
Coronavirus: रायगड, पनवेलमधील खेळाडू शारजाहून परतले; 14 दिवसांसाठी निरिक्षणाखाली
वटवाघूळ खाण्याची, त्यांचं रक्त व लघवी पिण्याची गरजच काय?; Corona Virusवरून पाक गोलंदाज भडकला
IPL 2020 : आयपीएल होणार की नाही? BCCIच्या बैठकीत सात पर्यायांवर झाली चर्चा
IPL 2020 : प्रेक्षकांविना क्रिकेट खेळण्यात मजा नाही; वीरेंद्र सेहवागची स्पष्ट भूमिका