Ben Stokes announces retirement from ODI cricket : '' वन डे क्रिकिटेमधील निवृत्तीचा निर्णय पचणारा नसला तरी पटणारा नक्की आहे. मी आता या फॉरमॅटमध्ये १०० टक्के योगदान देऊ शकत नाही. त्यामुळे माझ्याजागी प्रतिभावान खेळाडूला संघात स्थान मिळायला हवं. तीन फॉरमॅट खेळणे हे आता शक्य नाही. वेळापत्रक पाहता तीनही फॉरमॅटच्या क्रिकेटला न्याय देऊ शकत नाही. आता माझ्याकडे जे काही आहे ते मला कसोटी क्रिकेटला द्यायचे आहे आणि या निर्णयानंतर मी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करू शकेन, असे मला वाटते,''असे बेन स्टोक्सने सोशल मीडियावर लिहिले आणि आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटला रामराम केला. मंगळवारी डरहॅम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा वन डे सामना खेळणार आहे.
३१ वर्षीय स्टोक्सने २०११मध्ये आयर्लंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि १०४ सामन्यांत त्याच्या नावावर तीन शतकांसह २९१९ धावा व ७४ विकेट्स आहेत. २०१९च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये त्याने प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या वर्ल्ड कप फायनल लढतीत स्टोक्सने नाबाद ८४ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. त्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने घेतलेली कॅच ही क्रिकेटच्य़ा इतिहासातील सर्वोत्तम मानली जातेय.
पाहा हे दोन अफलातून व्हिडीओ...