Join us  

...अन् बेन स्टोक्सची पत्नी भडकली, असा व्यक्त केला राग

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स नेहमी या ना त्या कारणानं चर्चेत राहिलेलं व्यक्तीमत्व...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 9:57 AM

Open in App

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स नेहमी या ना त्या कारणानं चर्चेत राहिलेलं व्यक्तीमत्व... कधी मैदानावरील कामगिरीनं तर कधी बारमध्ये केलेल्या हाणामारीमुळे.. स्टोक्सची चर्चा व्हायलाच हवी. आताही एका फोटोमुळे स्टोक्स चर्चेत आला आणि यावेळी त्याच्यावर गंभीर आरोपही झाले. या आरोपांमुळे मात्र स्टोक्सला कमी, पण त्याच्या पत्नीला ( क्लॅरी) अधिक राग आला आणि तिनं टीकाकारांना चांगलंच धारेवर धरलं...

काही दिवसांपूर्वी स्टोक्सनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. त्यात एका मुलीचा हात आणि स्टोक्सचा चेहरा इतकंच दिसत होतं. त्या मुलीनं स्टोक्सचा चेहरा रागात पकडला असल्याचे दिसत होते. त्यावरून नेटिझन्सने स्टोक्स आपल्या पत्नीला मारहाण करतो की काय, असा अनेकांनी अंदाज बांधला आणि त्याच्यावर टीका केली.  Professional Cricketers’ Association awards दरम्यानचा हा फोटो आहे.

स्टोक्सवर होत असलेल्या टीकेवर क्लॅरी स्टोक्सने सडेतोड उत्तर दिलं. ती म्हणाली,''काय मुर्खपणा लावला आहे. लोकं काही तर्क लावून टीका करत आहेत. मी आणि बेन आम्ही एकमेकांच्या चेहरा असा पकडला आहे, म्हणून त्याचा अर्थ आम्ही भांडण करतो असं नाही. आम्ही एकमेकांसोबत मस्ती करत होतो. त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. 

बेन स्टोक्सच्या आयुष्यातील 'ट्रॅजेडी' मन अस्वस्थ करेल; कुटुंबात घडली होती भीषण घटना!किंग्स्टन : वर्ल्ड कप विजयाचा नायक, अॅशेस मालिकेतील तारणहार बेन स्टोक्सने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंग्लंड संघाला अविस्वसनीय विजय मिळवून दिले आहेत. इंग्लंडला पहिलावहिला वन डे वर्ल्ड कप जिंकून देण्यात स्टोक्सचा सिंहाचा वाटा आहे. शिवाय नुकत्याच पार पडलेल्या अॅशेस मालिकेत त्यानं एकहाती खिंड लढवत इंग्लंडला तिसऱ्या कसोटीत अश्यक्यप्राय विजय मिळवून दिला होता. त्यामुळेच इंग्लंडला मालिका बरोबरीत सोडवता आली. स्टोक्स आता इंग्लंड संघासाठी आणि तेथील क्रिकेट फॅन्ससाठी मोठा सेलेब्रिटीच आहे. यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या स्टोक्सच्या आयुष्यात सर्वकाही आनंदी आनंद आहे, परंतु भूतकाळात त्याच्या आयुष्यात अशी एक ट्रॅजेडी घडली आहे की ती ऐकताच आपलं मन अस्वस्थ होते.

बेन स्टोक्सचा मुळचा जन्म हा न्यूझीलंडचा..  इंग्लंडने वन डे वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी त्याच्या घरी कही खुशी कही गम असे वातावरण होते. कारण, ज्या देशात त्याच्या जन्म झाला त्याच देशाला त्यानं पराभूत केले होते. स्टोक्सच्या आयुष्यातील मनाला चटका लावणारी घटना घडलीय ती न्यूझीलंडमध्येच. SUN या वृत्तपत्राकडे दिलेल्या मुलाखतीत स्टोक्सच्या आईनं हा प्रसंग सांगितला अन् काळजाचा ठोकाच चुकला..

बेनच्या जन्माच्या तीन वर्षांपूर्वी त्याच्या सावत्र भाऊ व बहिणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. The Sun ने मंगळवारी हे वृत्त प्रसिद्ध केले अन् जगाला धक्काच बसला. मारेकरी रिचर्ड डन हा बेनची आई डेबचा पहिला पती आहे आणि त्याने मत्सर भावनेतून आठ वर्षीय ट्रेसी आणि चार वर्षीय अँड्य्रू यांची एप्रिल 1988 मध्ये गोळ्या घालून हत्या केली.''डनकडे आठवडाभरासाठी त्या मुलांची कस्टडी देण्यात आली होती आणि त्यावेळी त्यानं हे कृत्य केले. त्यानंतर त्यानं स्वतःलाही संपवले,'' असे त्या वृत्तपत्रात नमुद केले आहे.

टॅग्स :बेन स्टोक्सइंग्लंड