Join us  

डब्ल्यूटीसी फायनल तीन सामन्यांची असावी- रवी शास्त्री

शास्त्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले,‘ कसोटी चॅम्पियनशिप लोकप्रिय करायची असेल तर भविष्यात तीन सामन्यांचञया आयोजनाद्वारे विजेता ठरविला जाणेयोग्य ठरेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 7:07 AM

Open in App

मुंबई : भारतीय संघ पहिल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी)अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यास सज्ज आहे.तथापि मुख्य कोच रवी शास्त्री यांनी विजेत्याचा निर्णय होण्यासाठी ‘बेस्ट थ्री’चा(तीन सामने)अवलंब करण्यात यावा, असे मत व्यक्त केले आहे. १८ जूनपासून होणारा हा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ गुरुवारी पहाटे इंग्लंडला रवाना झाला.शास्त्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले,‘ कसोटी चॅम्पियनशिप लोकप्रिय करायची असेल तर भविष्यात तीन सामन्यांचञया आयोजनाद्वारे विजेता ठरविला जाणेयोग्य ठरेल. अडिच वर्षात होणाऱ्या या स्पर्धेचा विजेता तीन सामन्यांच्या मालिकेद्वारा ठरायला हवा. तथापि एफटीपी पाहता नव्याने आखणी करण्याची गरज असेल. कसोटी हा कठीण प्रकार असल्यामुळे डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना देखील फार मोठा सामना असेल. अखेरच्या दोन संघांना अंतिम सामना खेळण्याचा हक्क तीन दिवस किंवा तीन महिन्यात मिळालेला नाही. सर्वच संघ एकमेकांविरुद्ध खेळल्यानंतर दोन संघ अखेरचा सामन्यासाठी पात्र ठरले, हे महत्त्वाचे आहे.‘ 

टॅग्स :रवी शास्त्री