मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्ताने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा मुंबईत दाखल झाला आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील वर्ल्ड कप स्पर्धेच्या कार्यक्रमातील तो सदस्य आहे. पण, मंगळावीर त्याच्या छातीत अचानक दुखू लागले आणि त्याला दुपारी 1 वाजताच्या सुमारास मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले असून रिपोर्ट नॉरमल असल्याचे सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी लाराने भारताच्या माजी खेळाडूच्या सांगण्यावरून ताडोबा येथे सफारी करण्यासाठी गेला होता. लाराने सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळी सफारीचा आनंद लुटला. लारा हा क्रिकेट विश्वचषकाच्या एका कामासाठी मुंबईत आला आहे. यावेळी भारताच्या एका माजी खेळाडूने लाराला ताडोबा व्याघ्र प्रकल्यापा भेट देण्याचे सुचवले. त्यानुसार लारा ताडोबा येथे पोहोचला.
लाराने 131 कसोटीत 11953 धावा केल्या आहेत. नाबाद 400 धावांची ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. वन डेत त्याने 299 सामन्यांत 40.48च्या सरासरीनं 10405 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटी व वन डेत अनुक्रमे 34 व 19 शतकं, तर 48 व 63 अर्धशतकांचा समावेश आहे.