Join us  

मोठी बातमी: बंगाल टायगरची डरकाळी! Sourav Ganguly अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, २२ ऑक्टोबरला अर्ज भरणार 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) अध्यक्षपदावरून माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्या वाट्याला वाईट अनुभव आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 8:44 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) अध्यक्षपदावरून माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्या वाट्याला वाईट अनुभव आला. २०१९मध्ये बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर गांगुलीसमोर कोरोनाचं मोठं संकट उभं राहिलं. त्यातही त्याने BCCI च्या टीमला सोबत घेऊन इंडियन प्रीमिअर लीगचे आयोजन युएई व भारतात करून दाखवला. मात्र, त्यात सर्वोच्च न्यायालयानेही कुलिंग कालावधीचा नियम बाद केल्याने गांगुलीच अध्यक्षपदावर कायम राहिले असाच अंदाज होता. पण, चक्र फिरली आणि गांगुलीला बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे लागले. १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष असणार आहेत.

गांगुलीला हटवण्यामागे माजी अध्यक्ष एन श्रीनिवास यांचा हात असल्याची चर्चा रंगली. गांगुलीने मात्र मोजक्या शब्दात आपले मत व्यक्त करून भूमिका स्पष्ट केली. ''आपण नेहमी प्रशासकपदी कायम राहू शकत नाही. आता दुसरे काहीतरी करण्याची वेळ आली आहे. मी यापेक्षा वेगळे काहीतरी करेन. आयुष्यात चढ-उतार येत राहतात. या काळात स्वत:वर विश्वास ठेवणे सर्वांत महत्त्वाचे असते. मोठे काहीतरी करण्यासाठी आपण प्रत्येकजण छोटी छोटी पावले उचलतो. हे प्रयत्न दिवसेंदिवस करत राहावे लागतील. सर्वकाही पटकन मिळवायचे असेल तर ते शक्य नाही. तुम्ही एका दिवसात सचिन तेंडुलकर किंवा नरेंद्र मोदी बनू शकत नाही,''असे सूचक विधान गांगुलीने केले होते.

आता गांगुली पुढे काय करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती आणि एक बातमी समोर आली. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या ( CAB) अध्यक्षपदाच्या निवडणूकीत मैदानावर उतरणार आहे. येत्या २२ ऑक्टोबरला तो अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहे. गांगुलीने २०१५ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत CAB चे अध्यक्षपद भूषविले होते. 

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआय
Open in App