Join us  

T20 World Cup 2022 : Deepak Chahar ची माघार; जसप्रीत बुमराहची रिक्त जागा भरण्यासाठी तीन गोलंदाज ऑस्ट्रेलियाला रवाना होणार 

Deepak Chahar ruled out of the T20 World Cup 2022 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे आणि पहिल्याच सराव सामन्यात विजय मिळवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 10:43 AM

Open in App

Deepak Chahar ruled out of the T20 World Cup 2022 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे आणि पहिल्याच सराव सामन्यात विजय मिळवला आहे. पण, रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह हे दोन धक्के पचवून भारतीय संघाला या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळ करावा लागणार आहे. जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट अद्याप जाहीर झाली नसताना आणखी एक धक्का बसला आहे. दीपक चहर ( Deepak Chahar) याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली. BCCI ने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी काल NCA मध्ये चहर फिटनेस टेस्ट देऊ शकला नाही.

मोहम्मद शमीने ( Mohammad Shami) फिटनेस टेस्ट पास केली असून तो जसप्रीतच्या जागी मुख्य संघात खेळण्याची दाट शक्यता आहे. चहरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२०त दुखापत झाली होती आणि त्यानंतर त्याने वन डे मालिकेतून माघार घेतली होती. त्याचीही पाठ दुखावल्याचे वृत्त समोर आले होते आणि तो वेळेत तंदुरुस्त झाला नसल्याने त्याला वर्ल्ड कप मधून माघार घ्यावी लागतेय.. राखीव खेळाडूंमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. शमीसह तीन गोलंदाज आता ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आणि त्यापैकी एकाची मुख्य संघात वर्णी लागणार. रवि बिश्नोई व श्रेयस अय्यर हेही आज किंवा उद्या ऑस्ट्रेलियासाठी रवाना होतील.  

दीपकच्या जागी शार्दूल ठाकूरची निवड झाल्याचे वृत्त स्पोर्ट्स तकने दिले आहे. शमी, शार्दूल आणि मोहम्मद सिराज हे ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. डॉक्टर नितीन पटेलही आता भारतीय गोलंदाजांसोबत प्रवास करणार आहेत. शमीने फिटनेस टेस्ट पास केल्याने त्याची मुख्य संघात निवड निश्चित आहे, परंतु मागील वर्षभरात तो ट्वेंटी-२० सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत त्याचा समावेश होता, परंतु कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला माघार घ्यावी लागली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी तो फिट झाला नाही. 

भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल,  भुवनेश्वर कुमार,  हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग. राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर 

सराव सामन्यांचं वेळापत्रक ( Warm-up matches of the Indian team)   

भारत वि. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, १२ ऑक्टोबर भारत वि. ऑस्ट्रेलिया, १७ ऑक्टोबरभारत वि. न्यूझीलंड, १९ ऑक्टोबर 

मुख्य स्पर्धेतील वेळापत्रक

२३ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुपारी १.३० वाजल्यापासून, मेलबर्न२७ ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, दुपारी १२.३० वाजल्यापासून, सिडनी३० ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून, पर्थ२ नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, दुपारी १.३० वाजल्यापासून, एडलेड६ नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, दुपारी १.३० वाजल्यापासून, मेलबर्न१३ नोव्हेंबरला अंतिम सामना थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स, डिस्नी हॉटस्टार

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2दीपक चहरमोहम्मद शामीमोहम्मद सिराजशार्दुल ठाकूर
Open in App