इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सूर्यकुमार यादव हा स्टार खेळाडू म्हणून समोर आला आहे आणि मुंबई इंडियन्सनं आयपीएल २०२२साठी त्याला रिलीज केले तर सर्व फ्रंचायझींमध्ये त्याला आपल्या ताफ्यात दाखल घेण्यासाठी चढाओढ रंगलेली पाहायला मिळेल. सूर्यकुमार यादवनं त्याची आयपीएलमधील ऑल टाईम प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आणि त्याआधी त्याच्यासमोर काही अटी ठेवल्या होत्या. एक- त्यानं स्वतःला संघात निवडावे आणि दुसरी - मुंबई इंडियन्सचे फक्त चारच खेळाडू संघात असायला हवेत. सूर्यकुमार यादवनं जाहीर केलेला संघ पाहून सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर नाराज झालाले पाहायला मिळाला. त्यानं ट्विट करून 'माझं नाव नाही यावर विश्वासच बसत नाहीए', असे मत व्यक्त केले. ( Can’t Believe He’s Left Me Out: David Warner Reacts To SuryaKumar Yadav’s All-Time IPL XI)
सूर्यकुमारनं सलामीसाठी जोस बटलर आणि रोहित शर्मा यांची निवड केली. तिसऱ्या क्रमांकावर त्यानं विराट कोहलीची, तर चौथ्या क्रमांकासाठी स्वतःची निवड केली. आश्चर्याची बाब म्हणजे त्यानं संघात महेंद्रसिंग धोनीला स्थान दिलेले नाही.पाचव्या क्रमांकावर त्यानं दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सची निवड केली आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्यानं हार्दिक पांड्याची निवड केली आहे. तसेच त्यानं आंद्रे रसेल व रवींद्र जडेजा यांनाही स्थान दिले आहे. सूर्यकुमारनं २०१४ ते २०१८ या चार वर्षांत कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले आहे.फिरकीपटूंमध्ये त्यानं अफगाणिस्तान व सनरायझर्स हैदराबादच्या राशिद खानची निवड केली आहे. त्यानंतर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांना निवडले आहे.