नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांच्यासाठी सुरेश रैना हा मुलाप्रमाणेच आहे. पण त्याच्या परतण्याबाबत ते निर्णय घेऊ शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, हा निर्णय कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि त्याच्या नेतृत्वातील संघ व्यवस्थापनच करेल.’
गेल्या अठवड्यात सुरेश रैना भारतात परतला होता. त्यावर श्रीनिवासन यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता त्यांनीही नरमाईचे धोरण स्विकारले आहे. रैना याने त्यांच्यासोबत चर्चा केली असण्याची शक्यता आहे.
श्रीनिवासन यांनी सांगितले की, मी रैनाला माझ्या मुलाप्रमाणे समजतो. आयपीएलच्या फ्रांचायझींनी क्रिकेटच्या बाबतीत हस्तक्षेप केलेला नाही. मी देखील असेच करेल. रैनाचे संघात परतणे हे माझ्या हातात नाही. आम्ही संघ मालक आहोत. फ्रांचायझी मालक आहोत. पण खेळाडूंचे मालक नाही. संघ आमचा आहे. पण खेळाडू नाहीत. रैनाबाबत निर्णय धोनी आणि संघाचे सीईओ के.एस. विश्वनाथन घेतील.’ते पुढे म्हणाले की, ‘मी क्रिकेट कर्णधार नाही किंवा संघ व्यवस्थापनाला देखील कधीही सांगितले नाही की कुणाला घ्यावे. त्यामुळे मी त्यात हस्तक्षेप का करु?’
>पुन्हा संघासोबत खेळू शकतो - रैना
रैना याने सांगितले की, त्याला पारिवारीक कारणांमुळे भारतात परत यावे लागले. सीएसके आणि त्याच्यात कोणतेही वाद नाहीत. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी पुढची चार ते पाच वर्षे क्रिकेट खेळण्यास इच्छुक आहे. तसेच सध्या विलगीकरणाच्या काळातही मी सराव करत आहे. त्यामुळे मी पुन्हा संघासोबत दिसु शकतो’
Web Title: Can't decide on Raina's return - Srinivasan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.