MS Dhoni Injury : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा किती मोठा ब्रँड आहे, हे सर्वांना माहित्येय.. आयपीएलचे ४ जेतेपदं, एकाच संघाचे २०० सामन्यांत नेतृत्व करणारा एकमेव कर्णधार असलेल्या धोनीचा करिष्मा काल चेपॉकवर सर्वांनी पाहिला. ४१ वर्षीय महेंद्रसिंग धोनी अखेरची आयपीएल स्पर्धा खेळतोय आणि चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) प्रत्येक सामन्याता 'माही'चे चाहते मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले पाहायला मिळत आहेत. धोनीसोबत त्यांची भावनिक नाळ जोडली गेली आहे. अशात धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची बातमी समोर येतेय आणि काल तो राजस्थान रॉयल्सविरुद्ध चालताही येत नसताना फलंदाजीला आला अन् अखेरपर्यंत लढला. पण, हेच त्याला महागात पडतेय की काय, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.
महेंद्रसिंग धोनी काल मॅच संपल्यानंतर लंगडताना दिसला अन् चाहत्यांचं टेंशन वाढलं. तो पुढची मॅच खेळणार की नाही, असा प्रश्न त्यांना पडला. पण, चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाने आज धोनीच्या दुखापतीबाबतचे मोठे अपडेट्स दिले आहेत. दुखापतीनंतरही धोनी CSKसाठी खेळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ''तो खेळणार आहे,''असे CSKचे सीईओ कासी विश्वनाथना यांनी सांगितले. ते म्हणाले,''त्याच्या गुडघ्याला दुखापत झालीय, हे खरं आहे, परंतु त्याने आम्हाला खेळणार की नाही, याबाबत अद्याप सांगितलेले नाही.''
दरम्यान, बेन स्टोक्स ३-४ सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा अष्टपैलू आणि कसोटी संघाचा कर्णधार स्टोक्सला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी एक आठवडा लागेल, असे विश्वनाथन यांनी सांगितले. तो ३० एप्रिलच्या किंवा २७ तारखेच्या सामन्यासाठी तंदुरूस्त होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. १६.२५ कोटींचा हा खेळाडू दोन सामन्यांत ७ व ८ धावा करू शकला आहे आणि एकच षटक त्याने फेकलं आहे. दीपक चहरला बरं होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो आणि तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुनरागमन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिसांडा मगाला हाही तंदुरूस्त नाही.