कॅनबेरा : वेस्ट इंडिज संघाने कसोटी मालिकेत इंग्लंडला मानहानिकारक पराभव पत्करण्यास भाग पाडले. कसोटी मालिकेतील हीच कामगिरी वन डे मालिकेतही कायम राखण्यासाठी वेस्ट इंडिज संघाने कंबर कसली आहे. गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी विंडीज संघ जाहीर करण्यात आला. संघातील स्फोटक फलंदाज ख्रिस गेल या मालिकेतून जवळपास सहा महिन्यांनंतर विंडीजच्या वन डे संघात पुनरागमन करणार आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी विंडीज संघात गेलचा समावेश करण्यात आला आहे.
गेलने जुलै 2018 मध्ये वेस्ट इंडिजकडून अखेरचा वन डे सामना खेळला होता. 39 वर्षीय गेलने 281 सामन्यांत 9727 धाव केल्या आहेत आणि त्यात 23 शतकं व 49 अर्धशतकांचा समावेश आहे. दिग्गज फलंदाज ब्रायन लारानंतर ( 295 सामने) विंडीज संघाचे सर्वाधिक सामन्यांत प्रतिनिधित्व करण्याचा मान गेलने पटकावला आहे.
पहिल्या दोन व डे साठी विंडीजचा संघफॅबीयन अॅलेन, देवेंद्र बिशू, डॅरेन ब्राव्हो, ख्रिस गेल, शिमरोन हेयमायर, जेसन होल्डर, शाय होप्स, एव्हीन लुईस, अॅशली नर्स, किमो पॉल, निकोलस पूरण, रोव्हमन पॉव्हेल, केमार रोच, ओशाने थॉमस.