सिडनी : आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020 स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. प्रथमच पुरुष व महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा एकाच वर्षी वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार होणार आहेत. महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 21 फेब्रुवारीला सुरू होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. पुरुषांची वर्ल्ड कप स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेत 12 संघांमध्ये जेतेपदाची चुरस रंगणार आहे. ऑस्ट्रेलियातील 8 शहरांमधील 13 स्टेडियम्सवर दोन्ही वर्ल्ड कप स्पर्धांचे सामने खेळवण्यात येणार आहेत.
महिला संघाची गटवारी गट A : ऑस्ट्रेलिया ( 2010, 2012, 2014, 2018 चॅम्पियन्स), भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, पात्रता फेरीतील संघ
गट B : इंग्लंड ( 2009 चॅम्पियन्स), वेस्ट इंडिज ( 2016 चॅम्पियन्स ), दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, पात्रता फेरीतील संघ
पूर्ण वेळापत्रकासाठी क्लिक करा
https://www.icc-cricket.com/t20-world-cup/womens-fixtures
पुरुष संघाची गटवारी
गट A : पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पात्रता फेरीतील 2 संघ
गट B : भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, पात्रता फेरीतील 2 संघ
पूर्ण वेळापत्रक
https://www.icc-cricket.com/t20-world-cup/mens-fixtures
Web Title: Complet fixture of Indian Men's and Women's team in ICC T20 World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.