नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगळे राहण्यासंबंधी सरकारच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांना भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर यांनी सज्जड दम भरला आहे. सोशल मीडियावरुन गंभीर यांनी अशा लोकांना सावधानतेचा इशारा देताना ‘कोरोना संशयितांनी सुरक्षित रहावे किंवा जेलमध्ये जाण्याचा पर्याय स्वीकारावा,’ असे म्हटले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण भारत देश लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे. बहुतांश नागरिकांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे पालन करताना आपापल्या घरीच वेळ घालवला. मात्र रात्री नऊनंतर मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर आल्याने प्रशासनाची झोपमोड झाली.
यानंतर गंभीर यांनी ट्वीट केले की, ‘ स्वत:पण जातील आणि आपल्या परिवारालाही घेऊन जातील. क्वारेंटाइन की जेल! संपूर्ण समाजासाठी धोका बनू नये आणि आपापल्या घरामध्येच रहा. हे युद्ध नोकरी आणि व्यापाराविरुद्ध नसून आयुष्याशी आहे. आवश्यक सेवा देणाऱ्यांना अडचण होणार नाही, याकडेही लक्ष द्या. लॉकडाऊनचे पालन करा. जय हिंद!’
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतामध्ये आतापर्यंत १९ राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) नागरिकांना काळजी घेण्याविषयी आवाहन केले आहे. (वृत्तसंस्था)
Web Title: Coronavirus: Stay safe or go to jail! - Gautam Gambhir
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.