कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( सीपीएल) आज भारताच्या प्रविण तांबेनं पदार्पण केलं. बॉलिवूड सुपस्टार शाहरुख खानचा मालकी हक्क असलेल्या त्रिनबागो नाइट रायडर्स संघानं त्याला आजच्या सामन्यात त्याची अंतिम 11मध्ये निवड केली. सीपीएलमध्ये खेळणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. प्रविण तांबेचं वय वर्ष 48 अन् 323 दिवस इतके आहे. यापूर्वी त्यानं दुबईत एका लीगमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्याच्यावर कारवाई करताना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) खेळण्याची परवानगी नाकारली होती. प्रविण तांबेनं निवृत्ती जाहीर केली आणि आज तो सीपीएलमधून पदार्पण करत आहे.
CPL 2020 : कोरोना लढाईला बळ देतोय 'षटकार'; चेंडू सीमापार जाताच दान होताहेत साडेतीन हजार
वयाच्या 41व्या वर्षी त्याला राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याची संधी मिळाली. 2013मध्ये त्यानं आयपीएलमध्ये एन्ट्री घेतली. त्यापूर्वी या फिरकीपटूनं मुंबईतील अनेक क्लब्सचे प्रतिनिधित्व केलं होतं. 2013मध्ये त्यानं दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध पदार्पण केलं. त्यानंतर चॅम्पियन्स लीगमध्ये त्यानं पाच सामन्यांत सर्वाधिक 12 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. दुबईत झालेल्या टी10 लीगमध्ये हॅटट्रिक घेतली होती.
आज तो सीपीएलमध्ये पदार्पण करत आहे आणि त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जाणून घ्या वेळापत्रक26 ऑगस्ट - जमैका थलाव्हास वि. गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून26 ऑगस्ट - सेंट ल्युसीआ झौक्स वि. त्रिनबागो नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून 27 ऑगस्ट - बार्बाडोस ट्रायडंट्स वि. जमैका थलाव्हास, मध्यरात्री 3 वाजल्यापासून27 ऑगस्ट - सेंट ल्युसीआ झौक्स वि. सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स, सांयकाळी 7.30 वाजल्यापासून 28 ऑगस्ट - गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स वि. त्रिनबागो नाइट रायडर्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून 29 ऑगस्ट - बार्बाडोस ट्रायडंट्स वि. त्रिनबागो नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून30 ऑगस्ट - सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स वि. जमैका थलाव्हास, मध्यरात्री 3 वाजल्यापासून 30 ऑगस्ट - बार्बाडोस ट्रायडंट्स वि. सेंट ल्युसीआ झौक्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून31 ऑगस्ट - सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स वि. गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून1 सप्टेंबर - जमैका थलाव्हास वि. त्रिनबागो नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून2 सप्टेंबर - गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स वि. बार्बाडोस ट्रायडंट्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून2 सप्टेंबर - त्रिनबागो नाइट रायडर्स वि. सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून3 सप्टेंबर - सेंट ल्युसीआ झौक्स वि. गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून3 सप्टेंबर - जमैका थलाव्हास वि. सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून4 सप्टेंबर - बार्बाडोस ट्रायडंट्स वि. गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून5 सप्टेंबर - त्रिनबागो नाइट रायडर्स वि. सेंट ल्युसीआ झौक्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून6 सप्टेंबर - जमैका थलाव्हास वि. बार्बाडोस ट्रायडंट्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून6 सप्टेंबर - सेंट किट्स अँड्स नेव्हीस पॅट्रीओट्स वि. त्रिनबागो नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून7 सप्टेंबर - सेंट ल्युसीआ झौक्स वि. जमैका थलाव्हास, मध्यरात्री 3 वाजल्यापासूनउपांत्य फेरी8 सप्टेंबर - सायंकाळी 7.30 वाजता9 सप्टेंबर - मध्यरात्री 3 वाजताअंतिम सामना11 सप्टेबंर - मध्यरात्री 2.30 वाजता
थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स
अन्य महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक : भारतीय खेळाडूनं केली पत्नी व आईची हत्या; मुलांना फोन करून सांगितली घटना
जेम्स अँडरसननं पाकिस्तानची जिरवली; तिसऱ्या कसोटीत भीमपराक्रमाची नोंद केली!
इंग्लंडकडून वस्त्रहरण; पावसानं वाचवली पाकिस्तानची इभ्रत!
जेम्स अँडरसनच्या विश्वविक्रमात भारतीय फलंदाजांचा 'मोठा' वाटा; जाणून घ्या कसा!
IPL 2020 : युवराज सिंगसाठी घेतला होता डिसिजन; रोहित शर्मा पुन्हा बदलणार 'पोझिशन'!
सुरेश रैना करणार समाजकार्य; जम्मू-काश्मीरमधील ग्रामीण भागातील मुलांसाठी काम करण्याची इच्छा
IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीच्या संघानं ठेवला आदर्श; दुबईत जपला 'स्वदेशी' मंत्र!