त्रिनबागो नाइट रायडर्सनं कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL) शनिवारी दमदार खेळाचे प्रदर्शन केलं. शाहरूख खानचा मालकी हक्क असलेल्या नाइट रायडर्स संघानं सलग नवव्या विजयाची नोंद केली. शनिवारी झालेल्या लढतीत त्यांनी सेंट ल्युसीआ झौक्सचा पराभव केला. या सामन्यात कर्णधार किरॉन पोलार्डनं 200च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी केली आणि 3 विकेट्सही घेऊन इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमाची जोरदार तयारी केली आहे.
सुरेश रैनाच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सन्नी देओल आला पुढे!
प्रथम फलंदाजीला आलेल्या नाइट रायडर्सच्या सलामीवीरांना मोठी खेळी करता आली नाही. लेंडल सिमन्स ( 8) आणि टिऑन वेबस्टर ( 20) यांना अनुक्रमे स्कॉट कुगेलेईजन आणि जहीर खान यांनी बाद केलं. टीम सेईफर्ट आणि डॅरेन ब्राव्हो यांनी संघाचा डाव सावरला. सेईफर्ट 33 धावा करून माघारी परतल्यानंतर ब्राव्हो आणि पोलार्ड यांनी झौक्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ब्राव्होनं 42 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 50 धावा केल्या. पोलार्डनं 21 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचत 42 धावा केल्या. नाइट रायडर्सनं 5 बाद 175 धावा केल्या.
पोलार्डनं मागील तीन सामन्यांत 72, नाबाद 33 आणि 42 धावा केल्या. त्यानं या खेळीत 15 चौकार व 6 षटकार खेचल्या. यंदाच्या CPLमध्ये आतापर्यंत त्यानं 101 चेंडूंत 207 धावा केल्या आहेत. CPL2020मध्ये त्याचा 204.95 हा सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे. त्यानं CPLमध्ये दमदार कामगिरी करून IPLची जोरदार तयारी केली आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना झौक्सला 7 बाद 152 धावा करता आल्या. मार्क डेयालनं 40 आणि आद्रे फ्लेचरनं 42 धावा केल्या. पोलार्डनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ड्वेन ब्राव्हो आणि जयडेन सील्स यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020 : रैना, भज्जी नसले तरी फिकर नॉट; CSKनं पोस्ट केला महेंद्रसिंग धोनीचा भन्नाट Video
IPL 2020 : रैना, हरभजनसह सात 'मोठ्या' खेळाडूंनी घेतली माघार; त्यांच्या जागी कोण देणार संघांना आधार?
IPL 2020 : मुंबई इंडियन्सनची 'स्मार्ट रिंग' देणार कोरोनाशी लढा!
कोरोना आहे भाऊ!, PPE किट घालून 'तो' मेट्रोत बसला अन् मेजरमेंट टेपनं राखतोय सोशल डिस्टन्सिंग
IPL 2020 : तारीख पे तारीख; चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितली वेळापत्रकाची नवीन तारीख