नवी दिल्ली, दि. 10 - इंग्लंड संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आलेला आघाडीचा फलंदाज केविन पीटरसन सध्या नव्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. त्याची इंग्लडकडून क्रिकेट खेळायची संधी आता जराशीही उरली नाही आणि त्याला या गोष्टीचे अजिबात वाईट वाटत नाही. या उलट तो म्हणतोय, की तो इंग्लंडच्या संघाच्या बाहेर गेलो म्हणून त्याच लग्न टिकलं.
2008 मध्ये इंग्लंड संघाच्या कर्णधारपदाची सुत्रे संभाळणाऱ्या केविन पीटरसनला आता दक्षिण आफ्रिकेच्या संघातून खेळायचे आहे. काल झालेल्या एका मुलाखतीत त्यानं अनेक गौप्यस्फोट केलं. संघातून बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे त्यानं इंग्लंडच्या निवड समितीचे आभार मानले आहेत.
घरात चार भिंतींमध्ये राहून जो मानसिक दबाव येतो तो सहन करणे खूपच अवघड असते आणि दिवसेंदिवस तो दबाव वाढतच जातो. 2014 मध्ये इंग्लंड संघामधून माझी हकालपट्टी करून इंग्लंड व्यवस्थापनाने माझ्यावार एक उपकारच केले आहेत. त्यामुळेच माझं माझ्या मुलाबरोबरच नातं घट्ट झालं आणि माझं लग्नही सुरक्षित राहील, असे पीटरसन म्हणाला.
पीटरसन आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत होता ते म्हणजे तो आता दक्षिण आफ्रिकेत राहत आहे म्हणजे तो दक्षिण आफ्रिकेकडून खेळणार का? तर जर पीटरसनला दक्षिण आफ्रिकेकडून खेळायचे असेल तर त्याला आयसीसीच्या नियमानुसार 2019 पर्यंत वाट पहावी लागेल.
पीटरसन इंग्लंड संघाकडून 104 कसोटी, 136 वनडे आणि 38 टी-20 सामने खेळला आहे. कसोटीमध्ये 8181 धावा, वनडेमध्ये 4440 धावा आणि टी 20 मध्ये 1264 धावा त्याच्या नावावर आहेत.
Web Title: This cricketer wants to say that I lost my marriage due to being out of the team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.