कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात चेन्नईने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. त्यानुसार केकेआर संघाने चेन्नईसमोर 6 गड्यांच्या मोबदल्यात 203 धावांचे आव्हान दिले. आंद्रे रसेलच्या नाबाद 88 धावांनी केकेआरची स्थिती मजबूत केली. सुरुवातीलाच केकेआरच्या लागोपाठ गेलेल्या विकेट्समुळे केकेआर स्वस्तात निपटणार असे वाटले होते. मात्र, दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल्या भागीदारीने चेन्नईसमोर धावांचा डोंगर उभा करण्यात केकेआर यशस्वी झाला.
केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वात जास्त 88 रन्सची खेळी केली तर क्रिस लेनने 22, सुनील नरेन 12, रॉबिन उथप्पा 29, नितीश राणा 16, दिनेश कार्तिक 26, रिंकू सिंग 2, टॉम कुरेन 2 रन्सने योगदान दिले. तर चेन्नईकडून सुरेश रैनाने 1, शेन वॉटसनने 3, शार्दुल ठाकूरने 1, हरभजनने 1 विकेट घेतली.
09:41 - कोलकाता नाईट रायडर्सकडून चेन्नईसमोर 203 रन्सचे आव्हान
09: 37 - 19 ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर 6 विकेट गमावून 188 रन्स
09:36 आंद्रे रसेलच्या खेळीने केकेआरला सावरले
09: 33 18 ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर 6 विकेट गमावून 167 रन्स
09:29 केकेआरला पुन्हा झटका दिनेश कार्तिक 26 रन्सवर आऊट, स्कोर 165
09:28 आंद्रे रसेलचं अर्धशतक पूर्ण, 27 बॉल्समध्ये 54 रन
09:26 17 ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर 5 विकेट गमावून 163 रन
09: 23 आंद्रे रसेलची फटकेबाजी 24 बॉल्समध्ये 46 रन
09:15 - केकेआरचा स्कोर 16व्या ओव्हरनंतर 5 विकेटवर 138 रन
09:12 15 ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर पाच विकेट गमावून 123 रन, दिनेश कार्तिक(19) आणि आंद्रे रसेल(20) वर
09:11 15 ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर पाच विकेट गमावून 123 रन
09:07 केकेआरचा 14व्या ओव्हरमध्ये 5 विकेटवर 118 रनचा स्कोर
09:01 आंद्रे रसेलने लगावला पहिला चौकार, केकेआरचा स्कोर 5 विकेट गमावून 105 रन.
08:58 - केकेआरची एकही भागीदारी टिकली नाही. याचा संघाला फटका...केकेआरचा स्कोर 5 विकेटवर 103 रन
08: 53 - दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल मैदानात
08: 52 - 10 ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर 5 विकेट गमावून 89 रन्स
08: 49 - केकेआरच्या पाच विकेट, रिंकू सिंग आऊट...
08:48 - रॉबिन उथप्पा 29 रन करुन झाला रन आऊट
08:47 - केकेआरला आणखी एक झटका, केकेआर 4 विकेट गमावून 9 व्या ओव्हरमध्ये 87 रनच्या स्कोरवर
08:40 - शेन वॉटसनने घेतली तिसरी विकेट, 16 रन करुन नितीश राणा आऊट
08:37 - 8 ओव्हरमध्ये केकेआरचा स्कोर 80 रन.
08: 35 - 7 ओव्हरनंतर केकेआर दोन विकेट गमावून 73 रनवर
08:30 - केकेआरची दुसरी विकेटही गेली, रविंद्र जडेजाने घेतली लायनची विकेट, केकेआरचा स्कोर 5 ओव्हरमध्ये 51 रन...
08:26 - रॉबिन उथप्पाचा दमदार सिक्सर, केकेआर 5 व्या ओव्हरमध्ये 47 रनच्या स्कोरवर
08:23 - दोन ओव्हरनंतर कोलकाता नाईट रायडर्सचा स्कोर 1 विकेटच्या नुकसानावर 20 रन, मैदानात क्रिस लिन आणि रॉबिन उथप्पा
08:21 - दुस-या ओव्हरच्या तिस-या बॉलवर हरभजन सिंहने सुनील नरेनची घेतली विकेट. कोलकाता नाईट रायडर्सला पहिला झटका, सुनील नरेन 4 बॉलमध्ये 2 सिक्सर लगावून 12 रनवर आऊट
08 : 05 - सुनील नरीने आणि क्रिस लायन यांनी केली केकेआरच्या खेळाची सुरुवात...
7:54 - चेन्नई सुपर किंग्सने जिंकला टॉस, फिल्डींग करण्याचा निर्णय
चेन्नई : आयपीएलच्या 11व्या सीझनला जोरदार सुरुवात झाली असून आज चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. एकीकडे चेन्नई संघ अनुभवी खेळाडूंसपह मैदानात उतरेल तर दुसरीकडे कोलकाता संघ नव्या नेतृत्वाखाली आपली जागा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असेल. चेन्नईने आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सना मात दिली होती. तर दिनेश कार्तिकच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या सामन्यात बंगळुरुला मात दिली. त्यामुळे सध्यातरी दोन्ही संघ मजबूत स्थितीत आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार हे बघणे महत्वाचे ठरेल.
चेन्नई संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फॅफ ड्यू प्लेसिस, हरभजन सिंग, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, केदार जाधव, अंबाती रायुडू, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, जगदीशन नारायण, मिचेल सँटनर, दीपक चहार, के.एम. आसिफ, लुंगी एनगिडी, कनिष्क सेठ, ध्रुव शौरी, मुरली विजय, सॅम बिलिंग्स, मार्क वूड, क्षितीज शर्मा, मोनू सिंग, चैतन्य बिश्नोई.
कोलकाता संघ
दिनेश कार्तिक (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नरिन, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी, नितीश राणा, रिंकू सिंह, शुभमन गिल, कॅमेरॉन डेलपोर्ट, शिवम मावी, टॉम कुरन, जॅवोन सीरल्स, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, मिशेल जॉन्सन, पीयूष चावला, विनय कुमार, कुलदीप यादव.
Web Title: CSK vs KKR, IPL 2018 Live Score: Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders IPL 2018 Live Updates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.