कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट विश्वाला जोरदार धक्का बसला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत क्रीडा विश्वातील तिघांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी आफ्रिकन फुटबॉलपटू अब्दुलकादीर मोहमेद फराह याचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. तत्पूर्वी, स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याला वयाच्या २१ व्या वर्षी प्राण गमवावे लागले. त्यानंतर पाकिस्तानचे दिग्गज स्क्वॉशपटू आझम खान यांचा कोरोना व्हायरसमुळे लंडन येथे मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी लान्सशायर कौंटी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष डेव्हिड हॉजकिस यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. ते 71 वर्षांचे होते.
क्लबने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्विट केलं की,''डेव्हिड यांच्या कुटुंबीयांसोबतच लान्सशायर क्रिकेट क्लब आहे.'' डेव्हिड गेल्या काही दिवसांपूर्वी आजारी होते. मागील तीन वर्षापासू ते लान्सशायर टीमच्या मॅनेजर पदावर होते. यापूर्वी ते 22 वर्ष ओल्ड ट्रॅफर्ड येथे कार्यरत होते. लान्सशायक क्रिकेट क्लबमध्ये ते खजिनदार आणि उपाध्यक्ष या पदावरही होते.
जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 7 लाख 85,807 इतका झाला आहे, तर मृतांचा आकडा 37,820 पर्यंत पोहोचला आहे. 1 लाख 65,659 रुग्ण बरे झाले आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कॉलिन ग्रेव्सने सांगितले की,''डेव्हिड हे लान्सशायर क्रिकेट क्लबचे महत्त्वाचे सदस्य होते आणि कौंटी क्रिकेटचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रचंड योगदान दिले आहे.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Corona Virus : क्रीडापटूंचा पुढाकार; जाणून घ्या कोणी केलं किती दान!
डेव्हिड वॉर्नरचा 'वैदिक' पाठिंबा, विराट कोहलीला दिलं चॅलेंज
रोहित शर्माचं मोठं दान; हिटमॅननं मारला मदतीचा कौतुकास्पद चौकार
महाराष्ट्राच्या मल्लानं जपली सामाजिक जाण; राहुल आवारेनं केलं 'लाख'मोलाचं दान
सानिया मिर्झानं गरजूंसाठी जमा केले कोट्यवधी; मिताली राजचाही मदतीचा हात
मोठी बातमी; टोक्यो ऑलिम्पिकनंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलणार?