- सौरव गांगुली लिहितात...
आॅस्ट्रेलियात मालिका नेहमी रोमहर्षक होते. इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियात क्रिकेट चाहते कसोटीला प्राधान्य देतात. त्यामुळे मालिका सुरू होण्याआधी चर्चा गाजते. अॅडिलेडवर सामन्याआधी स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह वॉ यांच्यासारख्यांच्या उपस्थितीमुळे मालिकेला महत्त्व प्राप्त झाले.
मालिका विजयाच्या दावेदाराबद्दल अनेक गोष्टी पुढे आल्या. मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. गेल्या ३० वर्षांत ज्यांनी आॅस्ट्रेलियन दिग्गजांना पाहिले तसाच सध्याचा संघ असेल, असे वाटू नये. पण स्थानिक परिस्थितीचा लाभ यजमान संघाला होईल. सॅम कुरेन, बटलर, ख्रिस व्होक्स यांनी इंग्लंडमधञये स्थानिक परिस्थितीचा लाभ घेत भारतावर दडपण आणले होते. याच प्रकारे आॅस्ट्रेलियात हॅन्डस्कोम्ब, ट्रॅव्हिस हेड, आणि शॉन मार्श हे परिस्थितीचा लाभ घेतील, यात शंका नाही. आॅस्ट्रेलियाला कमकुवत मानण्याची चूक करण्यापेक्षा भारतानेही दमदार कामगिरी करायला हवी.
आॅस्ट्रेलियाची गोलंदाजीही चांगली आहे. पॅट कमिन्स, हेजलवूड आमि स्टार्क यांच्यासोबत नाथन लियोन हे भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजविण्याची कसर शिल्लक राखणार नाहीत.
सुरुवातीला अॅडिलेडमध्ये खेळण्याचा लाभ भारताने घ्यावा. येथील खेळपट्टी फलंदाजीला उपयुक्त मानली जाते. खेळपट्टीवर थोडे गवत असल्यास भारतीय गोलंदाजांना २० बळी घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तरीही मालिकेचा निर्णय फलंदाजांच्या कामगिरीवरच विसंबून असेल, असे माझे मत आहे. भारतासाठी विराट कोहलीच नव्हे तर इतरही सहकाऱ्यांचे योगदान
महत्त्वपूर्ण असेल. योगदानाचा माझ्यामते खरा अर्थ होतो, असे योगदान जे विजयास कारणीभूत
ठरावे. (गेमप्लान)
Web Title: The decision of the batsman to make the series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.