Join us  

सतत नापास होऊनही रिषभ पंतवर निवड समितीची मेहेरबानी, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात स्थान

संघाला गरज असताना पंतला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर चाहत्यांनी पंतला ट्रोल करत त्याला निवृत्तही केले. पण दुसरीकडे भारतीय निवड समिती पंतवर चांगलीच मेहेरबान होताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 7:00 PM

Open in App
ठळक मुद्देसातत्याने अपयशी ठरल्यावरसुद्धा पंतला संघात कायम ठेवण्यात आले आहे.

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने तब्बल तीन झेल सोडले. त्याचबरोबर पंतला फक्त सात धावाच करता आल्या. संघाला गरज असताना पंतला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर चाहत्यांनी पंतला ट्रोल करत त्याला निवृत्तही केले. पण दुसरीकडे भारतीय निवड समिती पंतवर चांगलीच मेहेरबान होताना दिसत आहे. सातत्याने अपयशी ठरल्यावरसुद्धा पंतला संघात कायम ठेवण्यात आले आहे.

भारत श्रीलंकेबरोबर तीन ट्वेन्टी-२० आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाबरोबर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही संघात पंतला संघात स्थान देण्यात आले आहे. पंतच्या निवडीमुळे चाहत्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे.

भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचे ट्वेंटी-20 आणि वन डे संघात पुनरागमन झाले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन ट्वेंटी-20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वन डे सामन्यांसाठी बीसीसीआयनं सोमवारी संघ जाहीर केला. रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर शिखर धवनची ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत वापसी झाली आहे. रोहित व शमी ट्वेंटी-20 मालिकेत खेळणार नाही.

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मानं 2019 वर्ष गाजवलं. भारताच्या मर्यादित षटकाच्या संघाचा उपकर्णधार रोहितनं कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. 2019 या कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहित शर्मा 1490 धावांसह आघाडीवर आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतही त्यानं पाच शतकं झळकावली होती. ट्वेंटी-20तही त्यानं समाधानकारक कामगिरी केली आहे. रोहित एक वर्ष सातत्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे आणि त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. 

शिखर धवन ऑगस्टमध्ये टीम इंडियाकडून शेवटचा वन डे सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो बाहेर होता. आता तोही कमबॅक करणार आहे. बुमराहनेही दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी माघार घेतली होती. त्यानंतर तो उपचारासाठी लंडनमध्येही गेला होता. संजू सॅमसनला ट्वेंटी-20 संघात पुन्हा स्थान मिळाले आहे.

श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया कधी व कुठे भिडणार?

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवण्यात येईल.

श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी टीम इंडियाविराट कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेचे वेळापत्रक 14 जानेवारी - मुंबई17 जानेवारी - राजकोट19 जानेवारी - बंगळुरू 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाविराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत. केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह.

टॅग्स :रिषभ पंतश्रीलंकाआॅस्ट्रेलिया