कोलंबो, दि. 3 - माजी कर्णधार एम. एस धोनीनं आज एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. असा विक्रम करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 फलंदाजांना यष्टिचीत करण्याचा विक्रम धोनीनं आपल्या नावावर केला आहे. 99 100 फलंदाजांना यष्टिचीत करत संगाकारा दुसऱ्या स्थानावर आहे. संगाकाराचा विक्रम मोडण्यासाठी धोनीला एका फलंदाजांना यष्टिचीत करायचे होते. श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या पाचव्या सामन्यात धोनीनं श्रीलंकेच्या धनंजयाची विकेट घेत 100 यष्टिचीत पूर्ण केल्या.
धोनीने भारतीय संघाकडून खेळताना 97 तर आशिया इलेव्हनकडून खेळताना तीन फलंदाजांना यष्टिचीत केले आहे. दरम्यान, यष्टीमागे सर्वाधिक बळी टिपणाऱ्या यष्टिरक्षकांच्या यादीत धोनी चौथ्या स्थानी आहे. 301 वा एकदिवसीय सामना खेळत असलेल्या धोनीच्या खात्यात 381 बळींची नोंद असून कुमार संगकाराने 404 सामन्यांत सर्वाधिक 482 जणांना शिकार बनवले आहे. त्यात 383 झेल आणि 99 यष्टिचीत आहेत. त्यानंतर 287 सामन्यांत 472 बळी टिपणारा ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्ट दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टिरक्षक मार्क बाउचर तिसऱ्या स्थानी असून त्याने 295 सामन्यांत 424 जणांना यष्टिमागे बाद केले आहे.
श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 238 धावा केल्या आहेत. भुवनेश्वर कुमारनं धारधार गोलंदाजी करताना पाच जणांना तंबूचा रास्ता दाखवला.
Web Title: Dhoni is the only player to have a world record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.