लीड्स - जो रूटचे शतक आणि कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नाबाद 88 धावांच्या जोरावर इंग्लंड संघाने तिस-या वन डे सामन्यात भारतावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. मंगळवारी हेडिंग्लेवर झालेल्या या सामन्यानंतर असे काही घडले की सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले.
सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाणा-या धोनीने अंपायरकडून मॅच बॉल घेतला. त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले. धोनी निवृत्ती घेणार की काय, अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे. धोनी अंपायरकडून चेंडू घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चाही रंगत आहेत, तर काही चाहते धोनीने असे का केले हे समजावून सांगत आहेत.
भारतीय संघ अडचणीत असताना अनेकदा धोनीने महत्वपूर्ण खेळी केली आहे. मात्र तिस-या वन डेमध्ये त्याला तो करिश्मा दाखवता आला नाही. त्याने 66 चेंडूंत 42 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईकर शार्दूल ठाकूरने 13 चेंडूंत नाबाद 22 धावा करून संघाला 250 धावांचा पल्ला ओलांडून दिला.
Web Title: Dhoni is retiring; Discuss going on after his one action
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.