Join us  

... अन् गांगुली जीव मुठीत धरून इंग्लंडमध्ये पळाला होता

एकदा एका मुलाने गांगुलीच्या डोक्यावर बंदूक ठेवली होती. तेव्हा गांगुलीने आपला जीव कसा वाचवला होता, ते तुम्हाला माहितेय का...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 7:42 PM

Open in App
ठळक मुद्देगांगुली नवज्योत सिंग सिद्धू यांच्याबरोबर फिरायला गेला होता. या दोघांना फिरताना थोडा उशिर झाला. तिथल्या मेट्रोमधून हे दोघे प्रवास करत होते

मुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा आज वाढदिवस. सर्वांचा लाडका  'दादा' आज 46 वर्षांचा झाला. त्यामुळे त्याचे काही किस्से सारेज जण शेअर करत आहेत. पण त्याचा एक किस्सा तुम्हाला माहिती नसेल, कारण बऱ्याच कमी लोकांना तो माहित आहे. एकदा एका मुलाने गांगुलीच्या डोक्यावर बंदूक ठेवली होती. तेव्हा गांगुलीने आपला जीव कसा वाचवला होता, ते तुम्हाला माहितेय का...

गांगुलीने 1996 साली इंग्लंडच्या दौऱ्यात भारताकडून पदार्पण केले. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात गांगुलीन शतक झळकावले होते. याच दौऱ्यातली ही गोष्ट, जेव्हा गांगुलीच्या डोक्यावर बंदूक ठेवण्यात आली होती. तर झालं असं की गांगुली नवज्योत सिंग सिद्धू यांच्याबरोबर फिरायला गेला होता. या दोघांना फिरताना थोडा उशिर झाला. तिथल्या मेट्रोमधून हे दोघे प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्यासमोर दोन मुलं आणि तीन मुली बसल्या होत्या. हे पाचही जणं मद्यधुंद अवस्थेत होते.

ही पाच जणं मेट्रोमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालत होती. त्यावेळी एका मुलाने बीअरचा कॅन गांगुलीच्या अंगावर फेकला. गांगुलीने त्यावेळी हुज्जत घातली नाही. तो शांत बसला. पण सिद्धू मात्र त्यांना या गोष्टीचा जाब विचारायला लागला. थोड्याच वेळात बाचाबाची सुरु झाली. सिद्धू काही शांत बसणारा नव्हता.  आपण दुसऱ्या डब्यात जाऊया, असे गांगुली सिद्धूला सांगायला लागला. गांगुलीचे हे बोलणे ऐकल्यावर तो त्यांच्यातला एक मुलगा भडकला आणि त्याने थेट बंदूक काढली. अन् ही बंदूक त्याने गांगुलीच्या डोक्याला लावली. तेव्हा आपली अखेर जवळ आली आहे, असे गांगुलीला वाटले. तेवढ्याच स्टेशन आले. हे पाहताच गांगुली आणि सिद्धू यांनी त्या मुलाला ढकलले आणि तिथून पळ काढत आपला जीव वाचवला.

टॅग्स :सौरभ गांगुलीक्रिकेट