इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला अवघे काही महिने उरलेत. भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता, विराटसेना विश्वविजयाची प्रबळ दावेदार मानली जातेय. परंतु, या संघात 'कॅप्टन कूल' हे मानाचं बिरूद मिरवणारा महेंद्रसिंग धोनी असावा की नसावा, यावरून दोन मतं आहेत. भारताला अनेक मानाच्या स्पर्धा धोनीनं जिंकून दिल्यात. त्याच्या अनुभवाचा टीम इंडियाला नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यामुळे तो संघात हवा, असं एक मत आहे. तर, धोनीच्या बॅटमधून धावा आटू लागल्यात, रन रेट वाढवण्यात तो कमी पडतोय, त्यामुळे रिषभ पंतला संधी द्यावी, असं काहींना वाटतंय.
याबद्दल तुमचं मत काय? धोनी टीम इंडियात हवा की नसला तरी चालेल?