यंदा प्रथमच आयपीएलचे सामने दूरदर्शनवर दाखवण्यात येणार आहेत. मात्र दूरदर्शनाला रविवारी होणाराच सामना दाखवता येईल. त्यातही हा सामना एक तास उशिरा दाखवावा लागेल. स्टार स्पोर्ट्सकडे आयपीएलच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क आहेत. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा प्रस्ताव मान्य केल्याने यंदा दूरदर्शनवर आयपीएलचे सामने पाहता येतील.
स्टार स्पोर्ट्सने आयपीएलच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क सप्टेंबरमध्ये खरेदी केले. यानंतर हे सामने आठवड्यातून एकदा दूरदर्शनवर दाखवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्टार स्पोर्ट्सला दिला होता. त्यामुळे आता दूरदर्शनला आठवड्यातून एकदा (रविवारी) आयपीएल सामना दाखवण्यात येईल. मात्र या सामन्याचे प्रक्षेपण त्यांना एक तास उशिरा करावे लागेल. प्रसार भारतीने ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली आहे. 'प्रथमच दूरदर्शनवर आयपीएल सामने पाहता येणार आहेत,' असे ट्विट प्रसार भारतीने केले आहे.
अनेकदा रविवारी आयपीएलचे दोन सामने असतात. मात्र त्यापैकी एकच सामना दूरदर्शनवर दाखवला जाईल. स्टार इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय शंकर यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. 'दूरदर्शनला एका आठवड्यात एकदाच सामना दाखवता येईल. रविवारी दाखवता येणाऱ्या या सामन्याचे प्रक्षेपण एक तास उशिराने होईल,' असे उदय शंकर यांनी सांगितले. आयपीएलचे सामने दूरदर्शनवर दाखवले जावेत, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून माहिती आणि प्रसारण विभागाचे प्रयत्न सुरु होते.
Web Title: Doordarshan to air one IPL 2018 match per week with one hour delay
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.