Join us  

विजय पाटील यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

डी. वाय पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 1:24 PM

Open in App

मुंबई : डी. वाय पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे. या पदासाठी पाटील यांचा एकमेव अर्ज आला असल्याने त्यांची या पदासाठी बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट संकेत होतेच. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. संजय नाईक आणि अमोल काळे यांची अनुक्रमे सचिव आणि उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे, तर साहलम शेख हे सहसचिव आणि जगदीश आर्चेकर हे खजिनदार असणार आहेत.

पाटील यांना बाळ महाडदळकर आणि युनायटेड फॉर चेंज या प्रतिस्पर्धी गटाकडून अध्यक्षपदासाठी पाठिंबा मिळाला आहे. एमसीएच्या याआधीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पाटील यांचा पराभव झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाजी मारली होती. मात्र नंतर एमसीएने सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने नियुक्त केलेल्या

लोढा समितीच्या शिफारशींचा अवलंब केल्याने पवार यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.यंदा पाटील यांच्यापुढे अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे आव्हान निर्माण होण्याचे शक्यता होती. मात्र परस्पर हितसंबंध मुद्दा मार्गात येत असल्याने नाइलाजाने संदीप पाटील यांना माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर दोन्ही प्रतिस्पर्धी गटांनी विजय पाटील यांना आपला पाठिंबा दर्शवित अध्यक्षपदाचे चित्र स्पष्ट केले.

मुंबई क्रिकेट संघटना निवडणूक :

अध्यक्ष : डॉ. विजय पाटील , बिनविरोध उपाध्यक्ष : अमोल काळे, बिनविरोध सचिव : संजय नाईक, बिनविरोध संयुक्त सचिव : शाहलम शेख,  196 मतं. खजिनदार : जगदीश आचरेकर, 189 मत

कार्यकारी सदस्य मंडळ :

१. उन्मेश खानविलकर 241 मत२. अजिंक्य नाईक, 201३. गौरव पय्याडे 180४. विहंग सरनाईक 165५. अभय हडप 160६. कौशिक गोडबोले 157७. अमित दाणी 144८. नदीम मेमन 140९. याझदेगर्दी खोदादाद 133.

टॅग्स :मुंबई