भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) रविवारी न्यूझीलंड दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेसाठी भारताचा 16 सदस्यीय संघ जाहीर केला. 24 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत हिटमॅन रोहित शर्मा आणि जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. या दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात निवड समितीनं पुन्हा एकदा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला डाववले. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळाली होती. जवळपास 1637 दिवसांनी संजूनं दुसरा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना खेळला होता.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी आणि कोणाचा पत्ता झाला कट
संजूला डावलल्यानं नेटिझन्स प्रचंड संतापले आहेत. पूण्यात झालेल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात संजूनं पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला होता, परंतु चार वर्षांनी टीम इंडियात परतलेल्या संजूला दुसऱ्या चेंडूवर माघारी परतावे लागले. त्यामुळे केवळ दोन चेंडू खेळवून बीसीसीआयनं संजूच्या प्रतीभेची चाचपणी केली का, असा सवाल नेटिझन्स करत आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी भारताचा संघ - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर.