ENG vs NZ Test : इंग्लंडने WTC चॅम्पियन न्यूझीलंडला लोळवले, कामगिरी अशी की टीम इंडियाचं टेंशन वाढवले

England vs New Zealand : इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडवर ७ विकेट्स राखून विजय मिळवून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 07:12 PM2022-06-27T19:12:31+5:302022-06-27T19:21:53+5:30

whatsapp join usJoin us
ENG vs NZ Test : Jonny Bairstow registered second fastest fifty for England in Tests, England white-washed WTC Champions New Zealand 3-0 in the Test series. | ENG vs NZ Test : इंग्लंडने WTC चॅम्पियन न्यूझीलंडला लोळवले, कामगिरी अशी की टीम इंडियाचं टेंशन वाढवले

ENG vs NZ Test : इंग्लंडने WTC चॅम्पियन न्यूझीलंडला लोळवले, कामगिरी अशी की टीम इंडियाचं टेंशन वाढवले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England vs New Zealand : इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडवर ७ विकेट्स राखून विजय मिळवून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. ऑली पोप, जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करताना इंग्लंडला हा विजय मिळवून दिला. बेअरस्टोने ४४ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७१ धावांची आक्रमक खेळी केली. जो रूटने नाबाद ८६ धावा करताना संघाचा विजय पक्का केला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या ( WTC) किवींना पराभूत केल्यानंतर इंग्लंडचा संघ टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. १ ते ५ जुलै या कालावधीत भारत-इंग्लंड यांच्यातला पाचवा कसोटी सामना होणार आहे. 

किवींच्या पहिल्या डावातील ३२९ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडची अवस्था ६ बाद ५५ अशी झाली होती. पण, जॉन बेअरस्टो ( १६२) व पदार्पणवीर जेमी ओव्हर्टन ( ९७) यांनी डाव सावरला. स्टुअर्ट ब्रॉडनेही ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना इंग्लंडला ३६० धावांपर्यंत मजल मारून दिली. किवींच्या दुसऱ्या डावात टॉम लॅथम ( ७६), कर्णधार केन विलियम्सन ( ४८), डॅरील मिचेल ( ५६) व टॉम ब्लंडल ( ८८) यांनी सुरेख खेळ केला. मिचेल व ब्लंडल या जोडीने पुन्हा एकदा किवींचा डाव सावरला. मिचेलने या दौऱ्यावर ६ डावांत १०७.६०च्या सरासरीने सर्वाधिक ५३८ धावा केल्या आहेत. 


किवींचा दुसरा डाव ३२६ धावांवर गडगडला. पहिल्या डावात ५ विकेट्स घेणाऱ्या जॅक लिचने दुसऱ्या डावातही त्याची पुनरावृत्ती केली. मॅथ्यू पॉट्सने तीन विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात अॅलेक्स लीस ( ९) व झॅक क्रॅवली ( २५) यांना अपयश आल्यानंतर ओली पोप व जो रूट यांनी डाव सावरला. या दोघांनी १३४ धावांची भागीदारी केली. पोप १०८ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने ८२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या जॉनी बेअरस्टोने ३० चेंडूंत अर्धशतक झळकावले. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. इय़ान बॉथम यांनी १९८१ मध्ये दिल्ली कसोटीत भारताविरुद्ध २८ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. १९८६मध्ये बॉथम यांनी ओव्हल कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध ३२ चेंडूंत ५० धावा केल्या होत्या. 

  • पहिल्या कसोटीत इंग्लंडने २७९ धावांचे लक्ष्य ७८.५  षटकांत पार केले
  • दुसऱ्या कसोटीत २९९ धावांचे लक्ष्य ५० षटकांत पार केले
  • तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने २९६ धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी ५४.३ षटकं खेळली. 

Web Title: ENG vs NZ Test : Jonny Bairstow registered second fastest fifty for England in Tests, England white-washed WTC Champions New Zealand 3-0 in the Test series.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.