चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) फलंदाज सुरेश रैनानं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमातून माघार घेतली. ''सुरेश रैनानं वैयक्तिक कारणास्तव भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो आयपीएलच्या यंदाच्या मोसमात खेळणार नाही. रैना आणि त्याच्या कुटुंबीयांना चेन्नई सुपर किंग्सचा पूर्ण पाठींबा आहे,''असे CSKचे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी सांगितले होते. पण, त्यानं नक्की माघार का घेतली, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पंजाब येथे राहणारे त्याच्या काकांचं भ्याड हल्ल्यात निधन झाले आणि त्यामुळे रैनानं माघार घेतल्याचीही चर्चा सुरू आहे.
IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्ससाठी अखेर आनंदाची बातमी आली; MS Dhoniचं टेंशन हलकं झालं
संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्यात येणार आहे. पण, रैना मायदेशात का परतला, याचे उत्तर तोच देऊ शकतो. दरम्यान, चेन्नईचे दोन खेळाडू अन् सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं रैनानं माघार घेतल्याचीही चर्चा सुरू आहे. रैनाच्या माघारीवर चर्चा सुरू असताना इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर याचं ट्विट व्हायरल झालं आहे. सहा वर्षांपूर्वी त्यानं रैनासाठी एक ट्विट केलं होतं आणि आता ते व्हायरल होऊ लागलं आहे. नेटिझन्सनी रैनाच्या आयपीएलमधून माघार घेण्याचा आणि आर्चरच्या ट्विटचा संदर्भ जोडला आणि पुन्हा एकदा आर्चरची ज्योतिषाचार्य म्हणून चर्चा सुरू झाली.
त्या भ्याड हल्ल्यात काकांपाठोपाठ आत्ये भावाचेही निधन; सुरेश रैनाची आरोपींना शिक्षा देण्याची मागणी
पाहा ट्विट...
पंजाब येथील भ्याड हल्ल्यावर रैना काय म्हणाला?
''पंजाबमध्ये माझ्या कुटुंबीयांसोबत जे घडलं ते अत्यंत भयानक होतं. माझ्या काकांची कत्तल करण्यात आली, माझी आत्या आणि दोन आत्येभाऊ हे गंभीर जखमी झाले. दुर्दैवानं काल रात्री एका आत्ये भावाचंही निधन झालं. आत्येची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे आणि ती लाईफ सपोर्टवर आहे,''असे रैनानं ट्विट केलं.
त्यानं पुढे लिहिलं की,''त्या रात्री नेमकं काय घडलं आणि कुणी केलं हे आतापर्यंत तरी आम्हाला कळलेलं नाही. पंजाब पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालावं, ही विनंती. हे भयंकर कृत्य कोणी केलं याची माहिती आम्हाला मिळायलाच हवी. अशा आरोपींना आणखी अपराध करण्यासाठी मोकळं सोडता कामा नये.''