कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. 13 मार्चला सिडनी येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे सामना खेळला गेला. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका स्थगित झाल्या. पण, आता 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना आजपासून एजीस बाऊल येथे सुरू होणार आहे.
मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा झालेल्याच नाहीत. त्यामुळे इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. वेस्ट इंडिजचा संघ 15-20 दिवसांपूर्वीच येथे दाखल झाला असून त्यांनी 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीनंतर सरावही केला. इंग्लंडच्या खेळाडूंनीही तीन दिवसांचा सराव सामना खेळला आहे. त्यामुळे दोन्ही संघ पुन्हा एकदा मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी आतूर आहेत.
कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवे नियम..
- कोरोना व्हायरसचा बदली खेळाडू - कसोटी सामन्यात एखाद्या खेळाडूमध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्यास त्याच्या जागी आता संघाला बदली खेळाडू खेळवता येईल. बदली खेळाडूला सामनाधिकारी मंजूरी देतील. पण, हा नियम वन डे आणि ट्वेंटी-20 सामन्यांसाठी लागू नसेल.
- थुंकी किंवा घामाच्या वापरावर बंदी - चेंडू चमकावण्यासाठी थुंकी किंवा घामाचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. चेंडूबाबतचा निर्णय पंच घेतील. नियमांचे उल्लंघन झालेले आढळल्यास खेळाडूंना वॉर्निंग दिली जाईल. दोन वेळा वॉर्निंग देऊनही खेळाडूंनी न ऐकल्यास संघाला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावसंख्येत पाच धावा जोडल्या जातील.
- तटस्थ पंच नसेल - कोरोना व्हायरसमुळे आलेल्या बंधनामुळे सध्यातरी स्थानिक पंचांची सामन्यासाठी नियुक्ती केली जाईल.
- अतिरिक्त DRS - प्रत्येक संघाला प्रत्येक डावासाठी अतिरिक्त DRS दिला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात प्रती डावासाठी तीन,तर मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी दोन DRS घेता येणार आहेत.
- प्रेक्षकांना नो एन्ट्री - कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे रिकाम्या स्टेडियमवर म्हणजेच प्रेक्षकांविना क्रिकेट सामना खेळवण्यात येणार आहे.
- अतिरिक्त लोगो - आयसीसीनं पुढील 12 महिन्यांपर्यंत अतिरिक्त लोगो वापरण्यास परवानगी दिली आहे. आता जर्सीवर चार लोगो वापरता येतील.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
64 वर्ष जुन्या महालात राहतो 'बंगाल टायगर'; पाहूया सौरव गांगुलीच्या महालाचे Unseen फोटो!
भारतीय क्रिकेटपटूंचा अॅटिट्यूड बदलणाऱ्या सौरव गांगुलीला क्रीडा विश्वातून वाढदिवसाच्या शुभेच्छा
वा माही, वा : महेंद्रसिंग धोनीचा जाहीरातींना नकार; नैसर्गिक खताचा ब्रँड तयार करणार!
'दादा'गिरी तो हम अंग्रेजों की धरती पर भी करेंगे...!
Viral Video : MS Dhoni ला शुभेच्छा देण्यासाठी हार्दिक पांड्या पत्नीसह पोहोचला रांचीत
टीम इंडियाचा फलंदाज 'डोसा' घेऊन पोहोचला विराट कोहलीच्या घरी, अन्...