नवी दिल्ली : भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज युवराज सिंग यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मुंबई इंडियन्सनेही त्याची जोरदार स्वागत केले. राष्ट्रीय संघाचा सदस्य नसल्याने युवराज स्थानिक क्रिकेटमधून आयपीएलची तयारी करत आहे. फावल्या वेळात तो सोशल मीडियावर सक्रीय असतो आणि सहकारी खेळाडूंना ट्रोल करण्याचा आनंद तो लुटतो. पण, कधीकधी इतरांची फिरकी घेण्याच्या नादात आपलीच गोची होते तेव्हा... असाच प्रसंग युवराजवर ओढावला आहे.
भारतीय संघाचा यष्टिरक्षक पार्थिव पटेल याला ट्रोल करण्याच्या प्रयत्नात युवराजच कोंडीत सापडला. पार्थिवने व्यायामानंतरचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यात तो ट्रेड मिलवर बसलेला होता आणि त्याने त्याखाली लिहीले की,'' व्यायामाचे आजचे सत्र पूर्ण झाले.''
उपरोधित टोल्यावर पार्थिवने दिलेले उत्तर युवराजची बोलती बंद करणारे होते. पार्थिव म्हणाला,'' माझ्याकडे व्हिडीओ एडिट करणारी टीम नाही, जे 15 मिनिटांचे सत्र दोन तासांचे करून दाखवतील.'' ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पार्थिवचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तर युवराजने जुलै 2017 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारताकडून एकही सामना खेळलेला नाही.